IMPIMP

Pune Mundhwa Police | मुंढवा पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकमधील पीडित मुलगी कुटुंबियांच्या ताब्यात

by sachinsitapure
Pune Mundhwa Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Mundhwa Police | कर्नाटकातील म्हैसूर येथील विजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील मुलीचा मुंढवा पोलिसांच्या बिट मार्शल यांनी शोध घेऊन तिला पोलीस आणि कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मुंढवा पोलिसांच्या बिट मार्शलच्या कर्तव्य तत्परतेमुळे मुलगी सुखरुप परत मिळाल्याने मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले. (Pune Mundhwa Police)

मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबियांनी विजयनगर पोलिसांकडे केली होती. पीडित मुलीला मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बी.टी. कवडे रोड, घोरपडीगाव या परिसरात असल्याची माहिती विजयनगर पोलिसांनी मुंढवा पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोगी यांनी घोरपडी बिट मार्शल विजय माने व किरण बनसोडे यांना मुलीचा शोध घेण्यास सांगितले.

पोलीस अंमलदार माने, बनसोडे व म्हैसूर पोलीस ठाण्यातील अंमलदार यांनी सुमित्रा कॉर्नर याठिकाणी जाऊन मुलीची
माहिती घेतली. मुलगी याच ठिकाणी असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन मुंढवा पोलीस
ठाण्यात आणले. याठिकाणी कायदेशीर कारवाई करुन मुलीला म्हैसूर पोलीस व पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या
ताब्यात सुखरुप देण्यात आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे,
अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा,
सहायक पोलीस आयुक्त आश्वीनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी
(Sr PI Mahesh Bolkotgi) यांच्या सूचनेप्रमाणे बिट मार्शल पोलीस अंमलदार विजय माने व किरण बनसोडे यांनी केली.

Related Posts