IMPIMP

Pune-Nashik Railway | पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता द्या, मुख्यमंत्र्यांचं रेल्वेमंत्र्यांकडे साकड

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shindes banners in aaditya thackerays worli constituency on occasion of navratri 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे (Pune-Nashik Railway) विकासाला गती मिळणार असून या
प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी
दिले. दरम्यान, पुणे- नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा (Pune-Nashik Railway) प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये (Union Cabinet) मंजूर
करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांच्याकडे केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन Maharashtra Rail Infrastructure Development Corporation (महारेल) च्या पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गासह (Pune-Nashik Railway) इतर प्रकल्पांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale), हेमंत गोडसे (Hemant Godse), श्रीरंग बारणे (Shrirang Barane), ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल (Rajesh Kumar Jaiswal), मुख्य सल्लागार सत्यप्रकाश, मुख्यमंत्री सचिवालयाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग या 235 कि.मी. प्रकल्पाचा लाभ पुणे, अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक जिल्ह्याला होणार असून देशातील सर्वात किफायतशीर अतिजलद मार्ग म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. 16 हजार 39 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून यात महाराष्ट्र शासनाचा (Maharashtra Government) 3 हजार 273 कोटी रुपयांचा हिस्सा आहे. या खर्चाला राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली असून सर्व आवश्यक त्या परवानग्या या प्रकल्पाला मिळाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरु करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केल्या.

 

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक सुरु असतानाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांध्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि ‘महारेल’च्या प्रकल्पांची माहिती दिली. पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीवर कार्यवाही करण्यात येईल, असे  रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title: Pune-Nashik Railway | Approve Pune-Nashik High Speed Rail Line, Chief Minister Eknath Shinde Requests Railway Minister

 

हे देखील वाचा :

Vedanta Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेला; विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना फोन?

Pune Crime | भावाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; विश्रांतवाडी परिसरातील घटना

Pune Water Supply | पुणे शहराला वर्षभर पुरणाऱ्या पाण्याचा मुठा नदीत विसर्ग

 

Related Posts