IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime | इन्स्टाग्रामवर फ्रेंडशिप करणे तरुणीला पडले महागात, पोलंडवरुन आलेल्या हिऱ्यांच्या पार्सलसाठी गमावले 11 लाख; वाकडमधील प्रकार

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | Making friendships on Instagram cost young woman, lost 11 lakhs for parcel of diamonds from Poland; type in the curve

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Pimpri Chinchwad Crime | सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून एखाद्या अनोळखी
व्यक्तीसोबत मैत्री करताना जपून रहावे असे पोलिसांकडून (Police) वारंवार सांगितले जाते. मात्र काहीजण याकडे दुर्लक्ष करतात आणि फसतात.
असाच एक प्रकार पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील एका तरुणीसोबत घडला आहे. तरुणीची इन्स्टाग्रामवर (Instagram) मैत्री झाली. त्यानंतर त्या
मित्राने पोलंडवरुन (Poland) हिऱ्यांचे दागिने (Diamond Jewelry) पाठवल्याचे सांगत तरुणीची 11 लाख 49 हजार 080 रुपयांची फसवणूक
(Cheating) केली. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 12 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत ताथवडे येथे घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आकाश सिंग (Akash Singh), प्रकाश (Prakash) आणि एक अनोळखी महिला यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) आयपीसी 420, 419, आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश सिंग नावाच्या व्यक्तीने फिर्यादी तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री केली.
तिचा विश्वास संपादन करुन तिच्यासोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग (WhatsApp Chatting) सुरु केली.
दरम्यान, आरोपीने तरुणीसाठी पोलंडवरुन सोने (Gold Jewelry) व हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम (Cash) असलेले पार्सल पाठवले असून ते कस्टममधून सोडवू घे, असे सांगितले.
यानंतर तरुणीला एका महिलेने आणि प्रकाश नावाच्या व्यक्तीने फोन केला.
त्या दोघांनी तरुणीकडून पार्सलची कस्टम ड्युटी (Customs Duty), हायकोर्ट (High Court),
मनी लॉन्डरिंग (Money Laundering), पोलीस व्हेरिफिकेशन (Police Verification),
ट्रान्सफर चार्जेस (Transfer Charges), इंन्शुरन्स (Insurance), स्टॅम्प चार्जेस (Stamp Charges)
आदींच्या बहाण्याने 11 लाख 49 हजार 080 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरण्यास सांगितले.
पैसे घेतल्यानंतर आरोपींनी तरुणीला कोणतेही पर्सल न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Making friendships on Instagram cost young woman, lost 11 lakhs for parcel of diamonds from Poland; type in the curve

 

हे देखील वाचा :

Selfiee Song Kudiyee Ni Teri Teaser | ‘सेल्फी’ चित्रपटातील ‘कुडीये नी तेरी’ गाण्याचा टीझर आउट; मृणालच्या ग्लॅमरस अंदाजाने वेधले सर्वांचे लक्ष

Pune Crime News | शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील ‘सायबर सेल’चा मोबाईलधारकांना दिलासा, हरवलेले मोबाईल परराज्यातून जप्त करुन केले परत

 

Related Posts