IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पेरणे फाटा येथे अभिवादन सोहळ्याला आलेल्या अनुयायांचे दागिने लंपास, लोणीकंद पोलिसाकंडून 7 जणांना अटक

by sachinsitapure
Arrest

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | विजयस्तंभाला अभिवादन (Bhima Koregaon Shaurya Din) करण्यासाठी आलेल्या अनुयायांच्या गर्दीचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला असून बसमध्ये चढताना नागरिकांच्या गळ्यातील दागिने (Gold Jewelry) लंपास करण्याच्या 3 घटना समोर आल्या आहेत. बसमध्ये चढत असताना नागरिकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 7 जणांना लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पेरणे (Perne Phata) येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी पेरणे गाव येथे आले होते. अनुयांयी हे पेरणे टोल नाका, पुणे नगर रोड येथुन बसमधून प्रवास करुन अभिवादनास जाण्याकरीता बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी सोनसाखळी चोरल्या होत्या. त्यातील चोरी करणाऱ्यांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी सोमवारी (दि.1 जानेवार) अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी नागरिकांचे दागिने चोरणाऱ्या अरुणा किशन गायकवाड (वय-40 रा. नुराणी गल्ली, जामखेड),
ऋषीकेश बंडु जाधव (वय-22 रा. गांधीनगर, तेलगाव नाका, ता. जि. बीड), अनिल उत्तम पवार
(वय-22 रा. नवगण राजुरी, खडक वस्ती जि. बीड), सचिन श्रीमंत गुंजाळ (वय-35 रा. खडकी देवळा, ता. वडवणी जि. बीड),
शंकर सर्जेराव गायकवाड (वय-34 रा. नाळवंडी नाका, जि. बीड), मिलींद वसंत शिंदे
(वय-20 रा. शताब्दीनगर, ता. जि. औरंगाबाद), नितेश रमेशराव बोधणकर (वय-34 रा. मु.पो. पिंपळगाव, ता. नांदगाव जि. अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता महिला आरोपी अरुणा गायकवाड हिला मॅजिस्ट्रीट कस्टडी मंजूर केली आहे. तर उर्वरित आरोपींना 5 जानेवारी पर्य़ंत पोलीस कस्टडी रिमांड (Police Custody) मंजूर केली आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station)
दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे (Senior PI Vishvajeet Kaingade)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे (API Ravindra Godse),
गजानन जाधव (API Gajanan Jadhav), शिरीष भालेराव (API Shirish Bhalerao) करीत आहेत.

Related Posts