IMPIMP

Pune Pimpri Crime | मित्राला मारहाण केल्याच्या रागातून टोळक्याने केले तरुणावर कोयत्याने वार; दिघीच्या माऊली चौकातील घटना

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | मित्राला माराहण (Beating) केल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना दिघी येथील माऊलीनगर चौकात घडली आहे. याप्रकरणी सहा जणांवर आयपीसी 324, 323, 506, 143, 147, 149 सह भारतीय हत्यार कायद्यांतर्गत (Indian Arms Act) गुन्हा (FIR) दाखल करुन चार जणांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) सोमवारी (दि.5) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

योगेश सुरेश जोगे (वय-19 रा. विनायक पार्क, कस्पटेवस्ती, दिघी), अमित अंकुश इंगवले (वय-22 रा. दिघी गावठाण), सोहेल अलिशीयर मिर्झा (वय-19 रा. विजयनगर, दिघी), तारीक हुसे आशिष चिंतापरम (वय-18 रा. गायकवाड नगर, दिघी) यांना अटक केली असून त्यांचे इतर दोन साथिदार फरार आहेत. याबाबत राहुल हरीभाऊ अंधारे (वय-19 रा. दिघी गावठाण मुळ रा. माणकेश्वर, ता. भुम. जि. उस्मानाबाद) याने दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा मित्र रोहीत जाधव याला कुणीतरी मारहाण केली होती.
याच रागातून आरोपींनी संगणमत करुन फिर्यादीला हाताने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच हातातील कोयता, बांबु आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
यामध्ये फिर्य़ादी याच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे.
मारहाण केल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजवली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरगुडे (PSI Hargude) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Out of anger for beating up a friend, the gang stabbed the youth with a spear; Incidents at Mauli Chowk in Dighi

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वसुलीसाठी आलेल्या गुंडांकडून महिलेच्या अंगाशी ‘झोंबा-झोंबी’; हडपसरच्या काळेपडळमधील घटना

Maharashtra Politics | राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली, निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime | हिंदु राष्ट्र सेनेच्या हंबीरवरील हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक; वडकीतील खूनाचा बदला घेण्यासाठी झाला हल्ला

 

Related Posts