IMPIMP

Pune PMC Elections | आगामी महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होणार – पालिका प्रशासनाचा दावा

सदस्य संख्या 173 वरून 166 पर्यंत कमी होणार

by nagesh
 Pune PMC Property Tax News | Now the municipal corporation's march to the income tax arrears! Will seal the income of big arrears, charge the businessmen for change of use

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune PMC Elections | पुणे महापालिकेची निवडणुक ही तीन किंवा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार याबाबत संभ्रम आहे. मात्र, तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच ही निवडणुक होईल असा दावा प्रशासनाकडून केला गेला आहे. दोन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असेही प्रशासनाने नमूद केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाचा संदर्भ घेत प्रशासनाने माहीती दिली आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार १६६ सदस्य निवडावे लागरार आहे.यापुर्वी झालेल्या प्रभाग रचनेतून १७३ सदस्य निवडुन येणार होते. ही संख्या आता सात ने कमी झाली आहे. यामुळे प्रभाग रचनेतही बदल करावा लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Pune PMC Elections)

 

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याच्या नगर विकास विभागाच्या आदेशामुळे निवडणुका आणखी लांबणीवर पडू शकतात. प्रभांगाचे प्रारुप तयार करणे, मतदार याद्या फोडणे, आरक्षण टाकणे यासर्व प्रक्रीयेला साधारणपणे तीन महीन्यांचा कालावधी लागू शकतो. यामुळे पुढीलवर्षी फेब्रुवारी- मार्च महीन्यात निवडणुक जाहीर होण्याची शक्यता आहे. (Pune PMC Elections)

 

राज्याच्या नगर विकास विभागाने मंगळवारी सांयकाळी राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, संख्या यांचे प्रारुप तयार करण्याच्या सुचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. यापुर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना निश्चित करून त्यानुसार प्रभाग रचना केली होती, आरक्षणही निश्चित केले गेले होते. राज्यातील सत्तातंरानंतर शिंदे – फडणवीस सरकारने तीन सदस्यीय प्रभागाएैवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुक घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयासह इतर काही मुद्दयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार असुन, कदाचित निकाल दिला जाऊ शकतो. तत्पुर्वीच राज्याच्या नगर विकास विभागाने प्रभाग रचना आणि संख्येसंदर्भात आदेश जारी केले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रभाग रचना सात दिवसांत तयार करू
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नवीन प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा हा आम्ही सात दिवसांत तयार करू शकतो. त्यानंतर तो जाहीर करणे आणि त्यानुसार मतदार याद्या फोडल्यानंतर त्यावर हरकती आणि आक्षेप नोंदविणे. त्यावरील सुनावणी घेणे. आरक्षणाची सोडत काढणे याकरीता प्रशासनाला कमीत कमी दोन ते अडीच महीन्याचा कालावधी लागू शकतो. ही प्रक्रीया पुर्ण होण्यास फेब्रुवारी उजाडू शकतो. यानंतर राज्य निवडणुक आयोगाकडून निवडणुक कार्यक्रम जाहीर केला जाईल. यामुळे निवडणुक ही फेब्रुवारी किंवा मार्च महीन्यापर्यंत होण्याची शक्यता आहे.

 

 

नगरसेवकांची संख्या घटणार
तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत पुणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या १७३ इतकी झाली होती. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत ही संख्या १६६ च्या आसपास असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख ५६ हजार इतकी आहे. या लोकसंख्येचा विचार करता, महापालिकेत १६६ नगरसेवक असु शकतील.

 

समाविष्ठ गावांतील प्रभागांची रचना भौगोलिक समतोल
सलमहापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश झाला आहे. या समाविष्ठ गावांपैकी ११ गावांचा एक प्रभाग तयार केला गेला होता.
या प्रभागातुन दोन सदस्य निवडुन आले होते. परंतु या प्रभागाची रचनाही भौगोलिकदृष्टया समतोल नव्हती.
शहराच्या दक्षिण – पश्चिम भाग आणि दक्षिण – पुर्व भागाचा या प्रभागात समावेश होता.
नव्याने तेवीस गावे महापालिका हद्दीत समाविष्ठ केली गेली आहे.
तीन प्रभाग पद्धतीनुसार या संपुर्ण ३४ गावांमध्ये प्रभाग रचना केली गेली होती.
या भागात मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांची संख्या अधिक निर्माण होणार होती.
मात्र, आता नवीन रचनेतही हाच भौगोलिक समतोल साधावा लागणार आहे.
यापुर्वी महापालिका निवडणुक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती.
जुन्या प्रभागांना या गावांचा भाग जोडून नवीन रचना केली जाण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune PMC Election | The upcoming pune municipal corporation election will be held according to the three-member ward structure – the claim of the municipal administration

 

हे देखील वाचा :

Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | ‘ईडी’ सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटतंय – सुप्रिया सुळे

BSF Jawan Gayatri Jadhav | भारताच्या सीमा सुरक्षा बलाची पहिली महिला जवान गायत्री जाधव शहीद

Pune Crime | गुन्हे शाखेचा येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा, गांजाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना अटक

Uddhav Thackeray – BMC Elections | मनपा निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र, म्हणाले – ‘जिंकण्यासाठी मैदानात उतरूया, बीएमसी आपल्याकडेच राहणार’

 

Related Posts