IMPIMP

Pune PMC News | टिळेकरनगर येथील रस्त्याच्या कामाच्या निविदेत भ्रष्टाचार ! माजी आमदाराच्या दबावाखाली निविदेतील अटी शर्ती बदलल्या; अधिकारी व सल्लागारांचे निलंबन करून फेरनिविदा मागवावी – काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे

by nagesh
Pune PMC News | Corruption in the tender for road work in Tilekarnagar! Tender terms changed under pressure from former MLA; Re-tendering should be called after suspension of officials and consultants - Pune City President of Congress Arvind Shinde

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईनन – Pune PMC News | कात्रज कोंढवा रस्ता (Katraj Kondhwa Road) येथून टिळेकरनगर (Tilekar Nagar) मार्गे पानसरे मार्गाला जोडणार्‍या रस्त्याच्या कामाच्या निविदेत ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत. या रस्त्याचे कामाची निविदा भरू नये यासाठी सत्ताधारी पक्षाचा माजी आमदार हा अन्य ठेकेदारांना धमकावत आहे. या निविदेतील अटी शर्ती दुरूस्त करुन फेरनिविदा काढावी अशी मागणी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde Congress) यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अरविंद शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामध्ये या कामामध्ये रस्त्यासोबतच २०० मी.चा बॉक्स कल्व्हर्ट बांधायचा आहे. परंतू ही बाब मूळ कामामध्ये लपविण्यात आली आहे. रस्ता व पूलाचा उल्लेख केल्यास रस्ता आणि पूलाच्या कामाचा पूर्वअनुभव असलेले ठेकेदारच निविदा भरू शकतील, म्हणून बॉक्स कल्व्हर्टचा उल्लेख छुप्या पद्धतीने करण्यात आला आहे. विशेष असे की बॉक्स कल्व्हर्टमध्ये अबेटमेंट पिलर असतात त्याचा दर हा अन्य ठेकेदारांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचा धरला आहे. कल्व्हर्टसाठी वापरण्यात येणार्‍या स्टीलची बीओक्यू क्वाटींटी धरण्यात आलेली नाही, असा आरोपी शिंदे यांनी केला आहे. (Pune PMC News)

 

या निविदेबाबत शहरातील एक माजी आमदार मनपाच्या ठेकेदारांना निविदा न भरण्याबाबत धमकावत आहे.
यामुळे प्रशासनाने या कामाच्या निविदेबाबत स्पर्धात्मक दर यावेत यासाठी पूवगणक पत्रक दुरूस्त करून फेरनिविदा काढावी.
तसेच सध्याची चुकीची निविदा करणारे कनिष्ट अभियंता, कार्यकारी अभियंता यांना निलंबित करून सल्लागारालाही काळ्या याद्यात टाकावे.
पथविभागाने यापुर्वी काढलेल्या पॅकेज १ ते ५ च्या निविदांमध्येही मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.
पॅकेज क्र. ४ च्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने ही निविदा रद्द केली आहे.
त्यामुळे टिळेकरनगरच्या कामातील निविदेबाबत ठोस कारवाई न केल्यास कायदेशीर दाद मागण्यात येईल,
असा इशारा शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune PMC News | Corruption in the tender for road work in Tilekarnagar! Tender terms changed under pressure from former MLA; Re-tendering should be called after suspension of officials and consultants – Pune City President of Congress Arvind Shinde

 

हे देखील वाचा :

Pune NCP News | G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले – प्रशांत जगताप

Maharashtra Election | काँग्रेसनंतर राष्ट्रवादीने केली बंडखोर उमेदवारावर निलंबनाची कारवाई, नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात

Nashik Graduate Constituency | तांबे पिता-पुत्रांच्या बंडखोडीनंतर ‘महाविकास’च्या नाशिक पदवीधर मतदार संघातील अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर

 

Related Posts