IMPIMP

Pune PMC News | ‘महापालिकेने खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या व्यायाम शाळा साहित्याचे तीन वर्षांनंतरही ऑडीट नाही’

व्यायाम साहित्य खरेदीची चौकशी करणार - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

by nagesh
Pune PMC Budget | Budget of Pune Municipal Corporation on March 24; The budget is likely to be in excess of Rs 8500 crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune PMC News | महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) मागील काही वर्षात खरेदी केलेले कोट्यवधी रुपयांचे व्यायाम साहित्य नेमके कोठे बसविले आहे, याची यादी भांडार विभाग आणि क्षेत्रिय कार्यालयांकडेही उपलब्ध नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोन्ही विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याने ‘व्यायाम साहित्य’ खरेदीमध्ये ‘गोलमाल’ झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महापालिकेने नगरसेवकांच्या मागणीनुसार कोरोनापुर्वीच्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणावर व्यायाम साहित्य खरेदी केली आहे. २०१७ -१८ ते २०१८ -१९ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे १५ कोटी रुपयांची खरेदी झाली आहे. विशेष असे की आर्थिक वर्ष संपताना मार्च महिन्याच्या मध्यावर साहित्य खरेदीच्या निविदांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच पुढील अवघ्या १५ दिवसांत ठिकठिकाणी साहित्य बसवून ३१ मार्चपुर्वी ठेकेदाराचे बिलही अदा करण्यात आलेेले आहे. संशयित पद्धतीने राबविण्यात आलेल्या व्यायाम साहित्य खरेदीवर ‘पोलीसनामा ऑनलाइन’ने वेळोवेळी प्रकाश टाकला आहे. तीन वर्षांपुर्वी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल यांनी याची दखल घेत व्यायाम साहित्य बसविल्यानंतर जीओ टॅगींग बंधनकारक केले होते. तसेच व्यायाम साहित्याचे ऑडीट करण्याचेही आदेश दिले होते. गोयल यांनी तांत्रिकदृष्टया यामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला असला तरी आज तीन वर्षांनी भांडार विभाग आणि क्षेत्रिय कार्यालयांकडे व्यायाम साहित्य कुठे बसविण्यात आले याची माहीतीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. (Pune PMC News)

व्यायाम साहित्य खरेदी ते प्रत्यक्षात जागेवर बसविण्याचा प्रवास असा होतो
नगरसेवकांकडून क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून नोंदविण्यात येणार्‍या मागणीनुसार व्यायामशाळा आणि ओपन जीमसाठी व्यायाम साहित्य खरेदी करण्यात येते. भांडार विभाग ङ्गक्त खरेदीची प्रक्रिया राबवून साहित्य संबधित क्षेत्रिय कार्यालयाकडे स्वाधीन करते व नोंद घेते. पुढे जाउन क्षेत्रिय कार्यालयामार्ङ्गत हे साहित्य नगरसेवकांच्या मागणीच्या ठिकाणी पोहोचवण्यात येते. वास्तविकत: व्यायामाचे साहित्य जागेवर बसवण्याची जबाबदारी ही संबधित ठेकेदाराची असते. हे साहित्य ज्याठिकाणी बसविले आहे, त्याचे ङ्गोटोग्राफ्सही बिलासोबत जोडून भांडार विभागाकडे देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते. परंतू प्रत्यक्षात केवळ स्वाक्षरी केेलेले डिलीव्हरी चलनच बिलासोबत जोडले असल्याचे भांडार विभागाकडील ङ्गाईल तपासणीनंतर दिसून येते. दक्षता विभागानेही यापुर्वी बसविण्यात आलेल्या व्यायाम साहित्याचे ऑडीट करण्याबाबत सुचित केले आहे. मात्र, त्यावर भांडार विभागाने ही जबाबदारी संबधित क्षेत्रिय कार्यालयांची असल्याचा शेरा मारून दक्षता विभागाने काढलेल्या त्रुटींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडे माहिती नाही
पुणे महापालिकेची १५ क्षेत्रिय कार्यालये आहेत. त्यापैकी एक असलेल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीमधील प्रभाग ४१ मध्ये किती ठिकाणी व्यायाम साहित्य बसविण्यात आले आहे, याची माहिती मागितली. परंतू त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही. नगरसेवकांकडून होणार्‍या मागणीनुसार रकमेचे लॉकींग करून भांडार विभागाच्या माध्यमातून एकत्रित खरेदी करण्यात येते. व्यायाम साहित्याचे फिटींग ठेकेदाराकडुनच करून घेण्यात येते. परंतू ते कोठे बसविण्यात आले याच्या नोंदी आमच्या कार्यालयाकडे नाहीत. ही जबाबदारी भांडार विभागाचीच आहे. आमच्या हद्दीमध्ये कुठे कुठे साहित्य बसविले आहे, याची माहिती तत्कालीन लिपिक व कनिष्ठ अभियंत्यांकडून घेउन देतो, असे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे यांनी सांगितले.

व्यायाम साहित्य क्षेत्रिय कार्यालयांच्या ताब्यात देण्यात येते

तत्कालीन भांडार प्रमुख यांची मार्च २०२० मध्ये प्रसिद्ध झालेली प्रतिक्रिया

क्षेत्रिय कार्यालय व उपायुक्त कार्यालयांकडून होणार्‍या मागणी नुसार भांडार विभाग केवळ खरेदीची प्रक्रिया राबवतो.
भांंडार विभागाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या वस्तू या संबधित क्षेत्रिय कार्यालयांच्या ताब्यात देण्यात येतात व त्याची पोहोच घेण्यात येते.
या वस्तूंच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी ही सर्वत: संबधित क्षेत्रिय कार्यालयांची आहे. – सुनिल इंदलकर, उपायुक्त, भांडार विभाग ( मार्च २०२० )

 

व्यायाम साहित्य खरेदी, हे साहित्य कोठे बसविण्यात आले आहे, त्याच्या सद्यस्थितीची चौकशी करण्यात येईल.
व्यायाम साहित्य ही अन्य सार्वजनिक वापरासाठी खरेदी करण्यात येणार्‍या वस्तूंची नोंदणी करण्याची
यंत्रणेत सुधारणा करण्यात येईल. व्यायाम साहित्य खरेदी मध्ये कोणी दोषी आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

– विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त.

 

Web Title :- Pune PMC News | Even after three years, there is no audit of exercise school materials worth crores of rupees purchased by the Municipal Corporation; Will investigate purchase of exercise material – Vikram Kumar, Municipal Commissioner

 

हे देखील वाचा :

IND Vs BAN Test | बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Pimpri Chinchwad Police | चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना केले ‘या’ विभागाशी संलग्न

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीमधून वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या ‘या’ स्पर्धकाला घ्यावा लागला घराचा निरोप

 

Related Posts