IMPIMP

Pune Police MCOCA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 99 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
IPS Ritesh Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MCOCA Action | हातातून मोबाईल घेतल्याच्या कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी करणाऱ्या वैभव उर्फ गोट्या तरंगे व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 99 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी वैभव उर्फ गोट्या राजाराम तरंगे (वय- 20 रा. दत्तवाडी, उरुळी कांचन), सागर अरुण सिन्हा (वय-19 रा. उरुळी कांचन), यश लोणारी (रा. तुपे वस्ती, पुणे) यांच्यावर आयपीसी 307, 324, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन तरंगे व सिन्हा यांना अटक केली आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना 5 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील दत्तवाडी येथे घडली होती.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम
3 (1)(ii), 3(2), 3(4) चा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Sr PI Shashikant Chavan) यांनी परिमंडळ- 5
पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे (Hadapsar Division) सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त गुन्हे
रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (PI Subhash Kale),
सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार (API Kishore Pawar), शिवशांत खोसे (API Shivshant Khose),
तपास पथकाचे पोलीस अंमलदार तेज भोसले, संदीप घनवटे, आशितोष गवळी, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांच्या पथकाने केली.

Related Posts