IMPIMP

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई

by nagesh
Pune Crime News | Pune's staunch criminal lodged in Nashik Jail, CP Ritesh Kumar's 4th action under MPDA Act

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी (Gang of Child Abductors) पुणे आणि परिसरात सक्रीय झाली आहे, असे खोटे मेसेज (Fake Messages) सोशल मीडियावर (Social Media) पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. ही एक अफवा असून नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पुणे पोलिसांनी (Pune Police) केले आहे. तसेच अशा प्रकराच्या खोट्या माहितीद्वारे अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्यात येईल असा इशारा देखील पुणे पोलिसांनी (Pune Police) दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील दोन दिवसांपासुन सोशल मीडियावर काही विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल केले जात आहेत.
त्यांना शाळेतुन पळवून, अपहरण (Kidnapping) करुन नेले आहे अशा अफवा पसरविल्या जात आहेत.
मात्र यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. अशा प्रकरारची कोणतीही घटना पुणे शहरात घडलेली नाही,
तरी पालकांनी अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये. असा प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष
(Police Control Room किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी (Police Station) संपर्क साधून घटनेची शहनिशा करावी असे आवाहन पुणे पोलिसांनी (Pune Police) केले आहे.

 

तसे अशा प्रकारची माहिती, संदेश, ऑडिओ, व्हिडिओ क्लीप, फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केले तर
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांना अशा प्रकारचा संदेश मिळाल्यास त्यांनी खात्री केल्याशिवाय तो पुढे पाठवू नयेत असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

Web Title :-  Pune Police | Rumors of child abduction gang active in Pune, legal action will be taken against those spreading false information – Pune Police

 

हे देखील वाचा :

Health Tips | सर्दी-खोकल्यापासून पचनापर्यंत, ‘हे’ एक सुपरफूड तुम्हाला ठेवते फिट

Nirmala Sitharaman | बारामतीमधील घराणेशाही संपविली तरच बारामतीचा विकास, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा राष्ट्रवादीवर घणाघात

Sugar Control Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी करावे डाळिंबाचे सेवन, जाणून घ्या फायदे आणि करावा वापर

 

Related Posts