IMPIMP

Pune School Reopen | 15 डिसेंबरपासून पुण्यात शाळा सुरु होणार? वर्षा गायकवाड यांनी दिले ‘हे’ संकेत

by nagesh
Varsha Gaikwad | might take decision close schools if omicron cases increases says maharashtra education minister varsha gaikwad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यभरातील प्राथमिक शाळा (Pune School Reopen) 1 डिसेबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omycron variant) आल्याने मुंबई, पुणे महापालिकेने शाळा बंद (School closed) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 डिसेंबर पर्यंत मुंबई आणि पुण्यातील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे दोन्ही महापालिकांनी जाहीर केले. दरम्यान मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याने पुणे आणि मुंबईतील शाळा सुरु (Pune School Reopen) होणार का असा प्रश्न पालकांना पडला आहे. यावर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल असे गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. टास्क फोर्ससोबत (Task Force) चर्चा करुन शाळांची नियमावली (School Rules) बनवली आहे. येथून पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील असेही त्यांनी सांगितले. (Pune School Reopen)

 

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत (vaccination) कोणतीही माहिती शालय शिक्षण विभागाकडे आलेली नाही.
परंतु लहान मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे.
त्यामुळे लहान मुलांचं लसीकरण सुरु व्हावं अशी आमची अपेक्षा असल्याचं मतही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

15 डिसेंबरपर्यंत पुण्यातील शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे मनपाने दिली.
पहिली ते आठवीच्या शाळा आता 15 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुणे मनपाने (Pune Municipal Corporation) घेतला.
तर 15 डिसेंबरपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पुणे मनपाने सांगितले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :- Pune School Reopen | decisions about schools reopen in pune and mumbai will be made by observing local levels said school education minister varsha gaikwad

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘देशासमोरील सर्व प्रश्नांची उत्तरं संविधानामध्ये मिळतात’

Pune Crime | पुण्यात भरदिवसा पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर तरूणावर बेछुट गोळीबार ! भारती विद्यापीठ परिसरातील घटना, प्रचंड खळबळ

Pune Crime | विना परवाना पिस्टल बाळगणारा गुन्हे शाखेकडून गजाआड, अग्नीशस्त्र जप्त

 

Related Posts