IMPIMP

Pune SPPU Admissions Process | पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; रजिस्ट्रेशन करण्यासाठी अवघ्या 3 दिवसांचा वेळ

by nagesh
SPPU News | Celebrating 'World Intellectual Property Day' at Savitribai Phule Pune University

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनPune SPPU Admissions Process | 12 वीच्या निकालानंतर राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये विविध कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) अंडरग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससाठी बुधवार, 15 जून 22 पासून प्रवेश प्रक्रिया (Pune SPPU Admissions Process) सुरू झाली आहे. विद्यार्थी या कोर्सेससाठी 15 ते 17 जूनदरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर प्रवेश परीक्षा होईल. ही प्रवेश परीक्षा (SPPU Entrance Exam) पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे, असे वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

30 हजार अर्ज येण्याची शक्यता

विद्यार्थ्यांना विद्यापीठातील कोर्सेससाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केवळ 3 दिवसांची मुदत आहे. या तीन दिवसात विद्यापीठातील विविध कोर्सेसच्या 2,500 जागांसाठी सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येण्याची शक्यता आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना प्रथम कॅम्पस कॉमन एंट्रन्स एक्झाम प्लॅटफॉर्म (CCEP) पोर्टलवर (Pune University admission portal) रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. यासाठी 15 ते 17 जून हा तीनच दिवसांचा कालावधी आहे. या प्लॅटफॉर्मवर 15 जून दुपारी तीन वाजल्यानंतर प्रवेश अर्ज आणि प्रवेश परीक्षेसंबंधी नोटीस प्रसिद्ध होईल. (Pune SPPU Admissions Process)

 

असे मिळेल हॉल तिकीट

या कोर्सेससाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांची प्रथम प्रवेश विभागाकडून छाननी होईल. ही छाननी पूर्ण झाल्यानंतर, प्रवेश परीक्षेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणि इतर माहिती ई-मेलने पाठवण्यात येईल. जुलैमध्ये ही प्रवेश परीक्षा होऊ शकते, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.

 

खासगी विद्यापीठांची प्रवेश प्रक्रियाही सुरू

खासगी विद्यापीठांनी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. एमआयटी-डब्ल्यूपीयू (MIT-WPU),
डीवाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (DY Patil University) यांच्यासह 14 विद्यापीठांचा प्री-एमिनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (PERA) नावाचा ग्रुप आहे.
या संपूर्ण ग्रुपची पेरा-सीईटी नावाची संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते.
परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची दुसरी फेरी सध्या सुरू आहे. अर्ज (PERA CET application form) भरण्याची शेवटची मुदत 26 जूनपर्यंत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune SPPU Admissions Process | sppu pune university admission procedure for under graduate students begins today know how to apply

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Police | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra State Government | राज्य सरकारचा तुकडे बंदी कायद्याबाबत मोठा निर्णय ! केले ‘हे’ मुख्य बदल

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खून, मृतदेह फेकला निरा नदीत; 5 संशयित ताब्यात

 

Related Posts