IMPIMP

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचा खून, मृतदेह फेकला निरा नदीत; 5 संशयित ताब्यात

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | अनैतिक संबंधाच्या (Immoral Relationship) संशयावरुन एकाचा खून (Murder) करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नीरा नदीत (Nira River) फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या (Walchandnagar Police Station) हद्दीत घडली असून पोलिसांनी 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. विकास संभाजी पाखरे (Vikas Sambhaji Pakhare) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे हात व पाय बांधून व पोटाला सिमेंटचा खांबाचा तुकडा बांधून कुरवली येथे नीरा नदीत फेकून दिले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी नवनाथ श्रीधर नवले (Navnath Sridhar Navale), सचिन श्रीधर नवले Sachin Sridhar Navale (दोघे रा. अकोले, जि. सोलापूर), महेंद्र आटोळे Mahendra Atole (रा. सावळ, ता. बारामती), दादा हगारे Dada Hagare (रा. पोंदवडी, ता. इंदापूर), साधना नवनाथ नवले Sadhana Navnath Navale (रा. अकोले, ता. माढा, जि. सोलापूर) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत मयताचा भाऊ सचिन संभाजी पाखरे Sachin Sambhaji Pakhare (वय – 33 रा. करकंब, ता. पंढरपूर) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur Taluka) करकंब (Karkamb) जवळील बादलकोट येथील विकास संभाजी पाखरे या युवकाचा खून झाला आहे. हा युवक पशुखाद्याच्या वाहतुकीचे काम करत होता. आरोपींनी गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्यावर पाळत ठेवली होती. 10 जून रोजी पाच जणांनी संगनमत करुन त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हातपाय बांधून पोटाला सिमेंटच्या खांबाचा तुकडा बांधून निरा नदीच्या पाण्यात फेकून दिले.

 

विकास पाखरे याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना दिसला. त्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढत त्याची ओळख पटवून अवघ्या दोन दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणून 5 जणांना ताब्यात घेतले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते (Addl SP Milind Mohite),
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub-Divisional Police Officer Ganesh Ingle)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातूरे (API Birappa Lature),
पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे (PSI Atul Khandare), शिवाजी निकम (PSI Shivaji Nikam),
पोलीस कर्मचारी रवींद्र पाटील, प्रमोद भोसले, अजित थोरात यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | murder of a youth on suspicion of immorality nira river

 

हे देखील वाचा :

Sarkari Pension | वार्षिक 60 हजार पेन्शन देईल मोदी सरकार, वयाच्या 40 पूर्वी करा ‘हे’ एक काम

Maharashtra Monsoon 2022 Update | मान्सूनची राज्यात विश्रांती, जोरदार सलामीनंतर झाले तरी काय ?

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रोहन जगताप 6 महिन्यांसाठी तडीपार

 

Related Posts