IMPIMP

MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याने पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर !

by bali123
pune students agitation in pune against postponement of mpsc exam

पुणे – सरकारसत्ता ऑनलाइन – अवघ्या दोनच दिवसांमध्ये असणारी एमपीएससी mpsc ची पूर्व परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील अनेक एमपीएससी mpsc देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे, तर पुण्यात सर्व मुले मोठ्या संख्येने आंदोलन करत एकत्र रस्त्यावर आली आहेत. अनेक ठिकाणी असा उद्रेक दिसून येत आहे. परीक्षा घ्यावी अशी त्यांची मागणी आहे.

पुणे शहरातील अनेक ठिकाणी विद्यार्थी अधिक प्रमाणात एकत्र रस्त्यावर आल्याने त्यांना गर्दी न करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. मात्र, विद्यार्थी मागे जायला तयार नव्हते. दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना आला त्यामुळे सर्वच परीक्षा रद्द केल्या. आता ही परीक्षा १४ मार्च रविवारी जाहीर झाली होती. विद्यार्थी परीक्षा देण्याच्या तयारीमध्ये असतानाच राज्य शासनाने ही परीक्षा काेरोनाच्या स्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली, तर अनेक विद्यार्थी या निर्णयाला विरोध दर्शवत आहेत. ही परीक्षा एक-दोन नाही तर आतापर्यंत पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.

तसेच राज्यात बँकिंगच्या परीक्षा, यूपीएससी परीक्षा, बोर्डाच्या परीक्षा होत आहेत,
तर फक्त एमपीएससीच्या परीक्षा न घेण्यामागे कारण काय आहे,
असा प्रश्न भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
काेरोना संक्रमण आहे तर भलेही या उमेदवारांना पीपीई किट घालून परीक्षा देऊ द्या, पण परीक्षा रद्द करू
नका, अशी मागणीही आमदार पडळकर यांनी केली आहे.

‘मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी ? चौकशी होऊ द्या, मग…’

Assembly Election 2021 : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला ‘राम राम’

Related Posts