IMPIMP

Pune Traffic Police | पार्किंग व नो-पार्किंगबाबत वाहतूक शाखेकडून आदेश जारी

by nagesh
 Pune Traffic Updates News | Order issued to stop traffic on Waghapur to Shindwane route; Citizens are urged to use alternative routes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   – Pune Traffic Police | पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेचे (Pune Traffic Police) पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी शहरातील पार्किंग, नो- पार्किंगसंबंधाने काही अंतिम आदेश तर काही तात्पुरते आदेश जारी केले आहेत. (Parking & No Parking Places In Pune)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन काही बाबतीत अंतिम आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विमानतळ वाहतूक विभागांतर्गत विमाननगर लेन क्रमांक २ ते श्रीकृष्ण हॉटेल आणि दत्त मंदीर चौक ते अपसाउथ हॉटेल लेन (विमाननगर लेन क्रमांक २) दरम्यान नो- पार्किंग घोषित करण्यात आले आहे. तर हॉटेल सांबर लेनच्या सुरवातीपासून ते अपसाउथ हॉटेल तसेच दत्त मंदिर चौक ते कैलास सुपर मार्केट चौक आणि द्वारका गार्डन चौक ते संघर्ष चौकापर्यंत सुमारे २०० मीटर पर्यंत पी १ पी २ असलेले पार्किंग घोषित करण्यात आले आहे. हे आदेश अग्नीशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

तात्पुरत्या स्वरुपातील आदेशांवर हरकती व सूचना देण्याचे आवाहन

वाहतूक शाखेने विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक तसेच फुटका बुरुज चौक ते वसंत दाते चौक या दरम्यान नो- पार्किंग घोषित करण्यात आल्याबाबतचे तात्पुरते आदेश जारी केले आहेत. त्याबाबत नागरिकांना काही हरकती व सूचना असल्यास पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, येरवाडा टपाल कचेरी, बंगला क्रमांक ६, पुणे येथे १७ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी करण्यात येतील, असेही श्री. मगर यांनी कळविले आहे.

 

Web Title :- Pune Traffic Police | Order Regarding Parking & No Parking Places In Viman Nagar Pune By Traffic Police

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | अजामीनपात्र वॉरंट जारी होताच संजय राऊत कोर्टात हजर, कोर्टानं वॉरंट केलं रद्द

Abdul Sattar | अब्दुल सत्तारांचा अंबादास दाणवेंवर पलटवार म्हणाले, ‘यांना तर…’

Pune PMC News | पुणे महापालिकेचा अंदाजपत्रकाचा मुहूर्त टळणार ! मुदतवाढीसंदर्भात स्थायी समितीसमोर प्रस्ताव

CM Yogi Adityanath On Mumbai Visit | ‘योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आले अन् ५ लाख कोटींची गुंतवणूक…’

 

Related Posts