IMPIMP

Pune Traffic Police | पुणे तिथं काय उणे ! वाहतूक पोलिसांनी सामानासह उचलली दुचाकी

by nagesh
Pune Traffic Police | pune traffic police tows two wheeler in Laxmi Road pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic Police) बेशिस्त वाहन चालकांवर (Unruly Drivers) कारवाई करण्यात येते. नो पार्किंगच्या (No Parking) ठिकाणी लावण्यात आलेल्या वाहनांवर पुणे वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) कारवाई करत असतात. काही महिन्यापूर्वी नाना पेठेत (Nana Peth) अशीच एक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी केवळ दुचाकीच उचलली नाही. तर दुचाकीवर बसलेल्या चालकासह दुचाकी उचलली. याचा व्हिडिओ सोशल मीडियात (Social Media) प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता अशीच एक घटना पुण्यातील लक्ष्मी रोडवर (Laxmi Road Pune) घडली आहे. मात्र, यावेळी वाहतूक पोलिसांनी सामानासह दुचाकी उचलली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुण्यातील मुख्य बाजारपेठ (Pune Main Market) म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मी रोडवर सोमवारी सकाळी 11 वाजता दोघे जण खरेदीसाठी दुचाकीवरुन आले होते. यावेळी पार्किंगच्या बाहेर दुचाकी लावून ते खरेदीसाठी गेले. त्याचवेळी पुणे वाहतूक पोलिसांची (Pune Traffic Police) गाडी नो पार्किंग किंवा पार्किंगच्या पांढऱ्या पट्टीबाहेर लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी आली. यावेळी दुचाकीमध्ये खरेदी केलेले सामान ठेवले होते. पोलिसांनी त्या साहित्यासह क्रेनच्या मदतीने दुचाकी उचलली.

 

आपली गाडी वाहतूक पोलीस उचलत असल्याचे पाहून त्या दोघांनी पोलिसांकडे जाऊन, साहेब नुकतीच गाडी लावी होती. आमच्या साहित्याचे नुकसान होईल. आमची गाडी सोडा, अशी विनंती केली. मात्र वाहतूक पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. या कारवाईचे रेकॉर्डिंग होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी ती गाडी सोडून दिली.

 

Web Title : Pune Traffic Police | pune traffic police tows two wheeler in Laxmi Road pune

 

हे देखील वाचा :

PF Interest Rate | जर 50,000 रुपये असेल सॅलरी तर PF वर व्याज कमी केल्याने होईल ‘इतके’ नुकसान; जाणून घ्या

Devendra Fadnavis | ‘माझे प्रश्न कोणी बदलले हे…’; पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत फडणवीसांचा खळबळजनक दावा !

Sleepiness After Lunch | दुपारच्या जेवणानंतर ताबडतोब झोप येते का? जाणून घ्या किती धोकादायक ठरू शकते ‘ही’ सवय

 

Related Posts