IMPIMP

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! एमईएस इलेव्हन संघाचा विजयाचा चौकार; एसके डॉमिनेटर्स संघाचा तिसरा विजय

by nagesh
Punit Balan Group | The third ‘s. Balan T-20 League Cricket Championship! MES XI's winning streak; Third victory for SK Dominators

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित तिसर्‍या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमईएस इलेव्हन संघाने आपले अपराजत्व कायम ठेवत सलग चौथा विजय मिळवला. एसके डॉमिनेटर्स संघाने स्पर्धेतील तिसरा विजय नोंदविला. (Punit Balan Group)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात महेश वाघिरे याच्या अचूक गोलंदाजीमुळे एसके डॉमिनेटर्स संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १० गडी राखून पराभव केला. केवळ दीड तासात झालेल्या सामन्यात दोन्ही डाव मिळून १८ षटकांतच खेळ संपला. कारण पहिल्यांदा फलंदाजी करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव २३ धावांवर गुंडाळला गेला. ही या स्पर्धेची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. एसके डॉमिनेटर्सच्या महेश वाघिरे (३-९), राकेश मते (३-५) आणि कुणाल सुर्वे (२-५) यांच्या गोलंदाजीपुढे गॅरी कर्स्टन संघाचा डाव २३ धावांवर आटोपला. एसके डॉमिनेटर्स संघाने ३.५ षटकात २९ धावा करून सहज विजय नोंदविला. (Punit Balan Group)

 

 

ओंकार आखाडे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एमईएस इलेव्हन संघाने माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा २१ धावांनी पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस इलेव्हन संघाने १७७ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाला उत्तर देताना माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा डाव १५६ धावांवर आटोपला. एमईएस संघाच्या ओंकार आखाडे (४-२२) आणि शुभम हरपाळे (२-२३) यांनी चमकदार गोलंदाजी करून संघाला सहज विजय मिळवून दिला.

 

 

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः

१) गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १३.४ षटकात १० गडी बाद २३ धावा (सार्थक चाकुरकर ५, महेश वाघिरे ३-९, राकेश मते ३-५, कुणाल सुर्वे २-५) पराभूत वि. एसके डॉमिनेटर्सः ३.५ षटकात बिनबाद २९ धावा (अक्षय पंचारीया नाबाद १९, शुभम खटाळे ९); सामनावीरः महेश वाघिरे;

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

२) एमईएस इलेव्हनः २० षटकात ६ गडी बाद १७७ धावा (हर्ष संघवी ४४, सागर बिरवडे २९, शिवम पटेल ३-२९) वि.वि. माणिकचंद ऑक्सिरीचः १८.५ षटकात १० गडी बाद १५६ धावा (पलाश कोंढारे ३८, ओंकार खाटपे २८, धीरज मंत्री २४, दिलीप मालविया २३, ओंकार आखाडे ४-२२, शुभम हरपाळे २-२३); सामनावीरः ओंकार आखाडे;

 

Web Title :- Punit Balan Group | The third ‘s. Balan T-20 League Cricket Championship! MES XI’s winning streak; Third victory for SK Dominators

 

हे देखील वाचा :

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजना ! सर्वात जास्त व्याज, मुलीच्या नावावर 250 रुपयांत उघडा खाते

Aryan Khan-Ananya Panday | …म्हणून नेटकऱ्यांनी आर्यन खान आणि अनन्या पांडेला IPL चा आनंद घेताना केलं ट्रोल

Namrata Malla Monokini Video | काळ्या रंगाची मोनोकिनी घालून ‘या’ अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लावली आग, व्हिडिओ पाहून चाहते झाले बेभान

 

Related Posts