IMPIMP

Punit Balan Studios | काश्मिरी पंडित आजही खरंच सुरक्षित आहेत का? निर्माता पुनीत बालन स्टुडिओजचा नवा चित्रपट ‘द हिंदू बॉय’

चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती

by Team Deccan Express
Punit Balan Studios | Are Kashmiri Pandits really safe today? Producer Puneet Balan Studios' new film 'The Hindu Boy'

सरकारसत्ता ऑनलाइन Punit Balan Studios | ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाच्या भव्य यशानंतर निर्माता पुनीत बालन ‘द हिंदू बॉय’ (The Hindu Boy) हा नवा बॉलिवूडपट घेऊन येत आहेत, ज्यात बॉलिवूड आणि टेलिव्हिजनचा लोकप्रिय अभिनेता शरद मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. काश्मिरी पंडितांपुढील आव्हानांवर भाष्य करणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या बॉलिवूडपटाने नुकतीच मोठी खळबळ उडवून दिली आहे. काश्मिरी पंडितांनी भूतकाळात काय भोगले, हे आपण पाहिले आहे, पण आता प्रत्यक्षात त्यांचे स्थान काय आहे? सध्या त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे? त्यांना अजूनही त्रास होत आहे का? ते अजूनही त्यांचे जीवन एखाद्या दुःस्वप्नासारखे जगत आहेत का? हे सर्व प्रश्न अत्यंत अस्वस्थ करणारे असून काश्मिरी पंडितांची परिस्थितीही अशीच आहे. पुनीत बालन आणि पुनीत बालन स्टुडिओज (Punit Balan Studios) यांनी त्यांच्या आगामी ‘द हिंदू बॉय’ या चित्रपटात या सगळ्यावर प्रकाश टाकला आहे. आता या आगामी चित्रपटाविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (Punit Balan Studios)

 

ट्रेलर रिलीज झाल्यापासून लोक या चित्रपटाविषयी सतत आपलं प्रेम आणि रुचि दाखवत आहेत. ‘द हिंदू बॉय’ ही एका हिंदू पंडित तरुण मुलाची कथा आहे, ज्याला त्याच्या संरक्षणासाठी काश्मीर मधून बाहेर पाठवण्यात आले होते, त्याला काय अनुभव येतो ? आणि ३० वर्षानंतर जेव्हा तो आपल्या घरी परत येतो तेव्हा त्याचे काय होते? लोकप्रिय अभिनेता शरद मल्होत्रा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. नागिन ५, विद्रोही, एक तेरा साथ, कसम, बनू मैं तेरी दुल्हन यांसारख्या मालिका आणि चित्रपटांतील विविध भूमिकांमुळे लोकांच्या पसंतीस उतरलेला शरद मल्होत्रा आता या नव्या आणि वेगळ्या भूमिकेतून आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देण्यासाठी सज्ज झाला आहे. (Punit Balan Studios)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुनीत बालन (Punit Balan) यांच्या बद्दल सांगायचं झालं तर ते नेहमीच लोकांसाठी सेलिब्रिटी राहिले आहेत; ते पुनीत बालन ग्रुपचे (Punit Balan Group) संस्थापक आणि सीएमडी तर आहेतच, शिवाय ते पुनीत बालन स्टुडिओचे संस्थापक आहेत, व्यावसायिक, सच्चे खेळाडू, कट्टर समाजसेवक, यशस्वी आणि हुशार निर्माते आहेत. पुनीत बालन म्हणजे माणूस एक, पण कलागुण आणि पैलू अनेक आहेत. ते लोकांच्या वेदना समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी १००% प्रयत्न करणारे व्यक्ती म्हणून परिचित आहेत, म्हणूनच ‘द हिंदू बॉय’ सारख्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, कारण तेच त्या वेदना समजू शकतात.

 

या चित्रपटाबद्दल बोलताना पुनीत बालन म्हणाले की, “मी अनेकदा काश्मीरला भेट देतो आणि तेथील लोकांच्या वेदना मी खूप जवळून पाहिल्या आहेत. आजही त्यांना संकटात पाहून मला दुःख होतं, तेही आपण मुक्तपणे आणि शांतपणे जगत असताना. मला नेहमीच त्यांच्यासाठी काही ना काही करण्याची इच्छा होती, ‘द हिंदू बॉय’ हा सिनेमा माझ्याकडे आला तेव्हा मी ते ठरवलं, हो! आपण या चित्रपटाची निर्मिती करायची आणि काश्मिरी हिंदू पंडितांच्या सद्य परिस्थितीची लोकांना जाणीव करून द्यायची. अलीकडेच ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट खूप गाजला आहे आणि त्याचे खूप कौतुक केले गेले आहे आणि मला आशा आहे की हा चित्रपट देखील लोकांना नक्कीच आवडेल.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘द हिंदू बॉय’ चित्रपटाचे दिग्दर्शन शाहनवाज बकाल यांनी केले असून त्याची कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली आहे.
मोहम्मद युनूस जरगर यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे.
तसेच गाणी विजय अकेला यांनी लिहिली आहेत.
गायक अविक दोजन चटर्जी यांनी गायना बरोबरच संगीतही दिले आहे.
ध्वनी डिझायनिंग फोले यांनी केले असून मिक्सिंग डी. जे. भरली यांनी केले आहे.
नोमोन खान या चित्रपटाचे कार्यकारी संचालक असून प्रमोशन डिझाइन पोस्टरवूडने केले आहे.

Web Title :- Punit Balan Studios | Are Kashmiri Pandits really safe today? Producer Puneet Balan Studios’ new film ‘The Hindu Boy’

हे देखील वाचा :

Related Posts