IMPIMP

Radhakrishna Vikhe Patil | उद्धव ठाकरे-भाजप युतीबाबत विखे-पाटील स्पष्टच बोलले, म्हणाले – ‘त्यामुळे नवी युती करण्याचा…’

by nagesh
Radhakrishna Vikhe Patil | radhakrushna vikhe patil on bjp and uddhav thackeray group alliance statement in buldhana

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी मालेगाव शहरात जाहीर सभा झाली. या सभेतून त्यांनी शिंदे गटासह (Shinde group) भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. यानंतर या भाषणातील काही मुद्यांवरुन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप युती (Alliance) होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी ही शिवसेनेसोबतच युती आहे. त्यामुळे नवीन युती करण्याचा प्रश्नच येतो कुठे? असे म्हटले. ते बुलढाण्यात बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे यांनी 2024 नंतर भाजप सरकारमध्ये आले तर देशात निवडणुका होणार नाहीत असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, मागील 25 वर्षे शिवसेनेनं (Shivsena) भाजपसोबत युती केली, त्यावेळी उद्धव ठाकरे यांना उपरती नाही झाली. त्यामुळे विश्वासघाताने सरकार स्थापन करुन मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरे यांना हे वाक्य शोभत नाही, उलट त्यांनी आत्मपरीक्षण करावं, हेच योग्य राहील, असा टोला लगावला.

 

उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा (Swatantryaveer Savarkar) अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिला. यावरून विखे पाटलांनी ठाकरेंना टोला लगावला.
ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या अधिपत्याखाली सरकार असताना,
औरंगाबादमधील औरंगजेबच्या कबरीवर (Aurangzeb Tomb) फुल उधळली गेली. त्यावेळी हे गप्प बसले.
सत्ता गेल्यावर त्यांना आता सावरकर दैवत वाटायला लागले, ही बाब चांगली आहे.
परंत, ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी हिंदुत्वाशी फारकत घेतली, त्यांच्या तोंडी ही विधान शोभत नाहीत, अशी फटकेबाजी विखे-पाटलांनी केली.

 

आगामी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे-भाजप युती होणार का? असा प्रश्न विखे-पाटील यांना विचारण्यात आला
असता ते म्हणाले, मला वाटतं की, हा जर-तरचा (हायपोथेटिकल) प्रश्न आहे.
सध्या आमची युती शिवसेनेबरोबरच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)
यांच्या शिवसेनेसोबतच भाजपची युती आहे. त्यामुळे नवीन युती करण्याचा प्रश्न यतोच कुठे?,
असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Radhakrishna Vikhe Patil | radhakrushna vikhe patil on bjp and uddhav thackeray group alliance statement in buldhana

 

हे देखील वाचा :

TORK Motors | टॉर्क मोटर्स पुणे डीलरशिपने वितरित केल्या 50 मोटारसायकल्स

Mahindra e-Alfa | 50000 वी इलेक्ट्रिक महिंद्रा ई-अल्फा हरिद्वार येथील कारखान्यातून बाहेर पडली

Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी

CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात; लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सरु करणार (व्हिडिओ)

 

Related Posts