IMPIMP

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

by nagesh
Rain in Maharashtra | journey back to monsoon from the state was long rain updates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rain in Maharashtra | राज्यात मागील दोन आठवडे विश्रांती घेतली होती. मात्र आता पावसाने पुन्हा जोरदार एन्ट्री (Rain in Maharashtra) मारली आहे. मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), कोकणामध्ये (Konkan) हवामान खात्याने (IMD) हायअलर्ट (High Alert) जारी केला आहे. पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पावसाच्या (Heavy Rain) सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुण्यातही (Pune Rain) अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्याचा दिवस पावसासाठी महत्त्वाचा आहे. काही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या अलर्ट नंतर प्रशासनही सतर्क झाले आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर (Flood) आल्यासारखी परिस्थिती आहे. पालघर जिल्ह्यासाठी (Palghar District) 7 ऑगस्टला येलो अलर्ट देण्यात आला होता. यानंतर आता पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. याचाच अर्थ आजपासून पुढचे चार दिवस पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढील चार दिवसांत पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे ठाणे आणि मुंबईसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला. यानंतर पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला आहे. मुंबईत 11 ऑगस्टला परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

या जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज आणि उद्या कोकणात मुसळधार पाऊस असणार आहे. कोकणातील रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात 9 ऑगस्टपासून ऑरेंज अलर्ट असणार आहे. म्हणजेच पाऊस कमी होईल. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

पुण्यात रेड अलर्ट

पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता.
तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर पुढच्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे कोल्हापूरसाठी (Kolhapur) आज रेड अलर्ट तर पुढच्या काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच सातारा जिल्ह्यासाठी (Satara District) आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

इतर जिल्ह्यात काय परिस्थिती असेल

धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे.
तर पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट असेल. तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट (Green Alert) जारी करण्यात आला आहे.
याठिकाणी फार काही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात 9 किंवा 10 ऑगस्टला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इतर दोन दिवसांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

Web Title : –  Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

हे देखील वाचा :

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

Cholesterol | ‘या’ हिरव्या भाजीपासून तयार करा स्पेशल Herbal Tea, हाय कोलेस्ट्रॉलपासून होईल सुटका

 

Related Posts