IMPIMP

Jayant Patil | सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला हे समजलं, जयंत पाटलांचा थेट हल्लाबोल

by nagesh
Jayant Patil | ncp jayant patil reacts on attack at sharad pawar residence taunts chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या
सिल्व्हर ओकवर हल्ला (Silver Oak Attack Case) केला त्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले याचा अर्थ त्या कर्मचाऱ्यांना सिल्व्हर
ओकवर जाण्यासाठी कुणी फुस लावली होती हे लक्षात येते, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नाला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उत्तर देताना आपले मत व्यक्त केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रकांत पाटलांवर निशाणा

आई-वडिलांना शिव्या देणे अत्यंत चुकीचे आहे. मराठी माणसे असे कधीही करत नाहीत. चंद्रकांतदादा यांना आई-वडिलांना शिव्या द्या असे सांगणे हे योग्य आहे असे मला वाटत नाही. मोदी (PM Narendra Modi) आणि शहांची (Amit Shah) तुलना आई-वडिलांशी करणे हे अत्यंत चुकीचे आहे, हे हिंदू संस्कृतीमध्ये (Hindu Culture) बसत नाही, असा टोला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लगावला.

 

 

रश्मी शुक्लांना जर क्लीन चिट दिली असेल…

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांची चौकशी सुरु होती त्या प्रकरणात नेमके काय समोर आले आहे आणि क्लोजर रिपोर्टमध्ये (Closure Report) काय लिहिले आहे हे पाहिल्याशिवाय त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. जर क्लीन चिट (Clean Chit) दिली असेल तर त्यामध्ये त्याची कारणे लिहिली असतील असंही जयंत पाटील म्हणाले. आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली नाही ते निष्ठावंत आहेत. कदाचित त्यांनी साथ सोडावी यासाठी दबाव आणला जात असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

 

 

धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले तर…

उद्धव ठाकरे यांच्या सभेने खरी शिवसेना (Shivsena) कोणाची हे स्पष्ट झाले आहे. धनुष्यबाण हे चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचेच आहे. जर निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला (Shinde Group) चिन्ह दिले तर त्यांच्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केले जाईल, असेही पाटील म्हणाले. शिंदे गटाच्या सभेला एवढा खर्च करण्यात आला. लोकांना अक्षरश: कोंबून मुंबईला आणले त्यांना माहिती देखील नव्हती असे सांगतानाच या सर्व प्रकराची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोहन भागवतांना टोला

निवडणूका जवळ आल्या की, अशी काही विधाने करायची आणि त्या वर्गाला चुचकारायचं अशी स्ट्रॅटेजी काही जणांची असू शकते.
मी मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्याबाबत बोलत नाही.
मात्र मधल्या काळात ते मुस्लिम धर्मगुरुंना देखील भेटले होते असा उपरोधक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

 

 

Web Title :- Jayant Patil | ncp jayant patil reacts on attack at sharad pawar residence taunts chandrakant patil

 

हे देखील वाचा :

MP Udayanraje On Govt Officers – Satara News | “काम नाही केलं, तर वाडगं घेऊन..”, उदयनराजेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

NCP Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ज्या-ज्यावेळी शिवसेना फुटली तेव्हा निवडणुकीत आमदार पडले, राणे तर पोटनिवडणुकीतही पडले; अजित पवारांनी डिवचले

Chandrakant Patil | ही कुठली हिंदू संस्कृती?, चंद्रकांत पाटलांच्या आई-वडिलांना शिवी देण्यासंदर्भातील वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा सवाल

Harbhajan Singh On Punjab Cricket Association | पंजाब क्रिकेट असोसिएशनवर हरभजन सिंगने केला ‘हा’ गंभीर आरोप

 

Related Posts