IMPIMP

Rajmudra On MNS Flag | ‘मनसे’च्या झेंड्यावरील राजमुद्रा बेकायदेशीर नाही; पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध वकिलाने दिला दाखला

by nagesh
Rajmudra On MNS Flag | MNS chief raj thackeray rajmudra on mns flag is not illegal testimony given by famous lawyer asim sarode

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rajmudra On MNS Flag | औरंगाबादमधील सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे या सभेमध्ये मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा (Rajmudra) ऐवजी रेल्वे इंजिन (Railway Engine) घेण्यात आलं आहे. यावरुन सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. राजमुद्रा ऐवजी इंजिन का घेतलं ? असा सवाल उपस्थित होत आहे. राजमुद्रा वापरणे कायदेशीर की बेकायदेशीर ? असा सवाल उपस्थित होत असतानाच पुण्यातील नामवंत वकिल असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी राजमुद्राच्या वापराबाबत कायदेशीर माहिती दिली. (Rajmudra On MNS Flag)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”मनसेच्या (MNS) झेंड्यावरील ‘राजमुद्रा’ बेकायदेशीर नाही. छत्रपतींची राजमुद्रा स्वाभिमानी इतिहासाची निशाणी आहे. त्या राजमुद्रेचे कुणी कॉपीराइट घेतलेले नाही व घेऊसुद्धा शकत नाहीत. भारत स्वतंत्र झाला तेव्हाच संविधानाने सगळे जुने पद, पदव्या, टायटल्स (जुने चिन्ह, निशाण्या) रद्द केले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेच्या झेंड्यावर असलेली ‘राजमुद्रा’ काढून टाका असे सांगण्याचा कुणालाच अधिकार नाही. मनसेच्या झेंड्यावर तेव्हाची ‘ राजमुद्रा’ असणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरत नाही, मनसेच्या झेंड्यावर ‘राजमुद्रा’ असणे बेकायदेशीर सुद्धा ठरत नाही.”असं वकिल असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. (Rajmudra On MNS Flag)

 

दरम्यान, औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत मनसेला दमदारपणे उतरायचं आहे. त्यासाठी मनसेने जय्यत तयारी सुरू केली आहे. अशावेळी सभा, मेळावे घेताना पक्षाचं चिन्हंही लोकांपर्यंत गेलं पाहिजे. यामुळे राज ठाकरे यांनी झेंड्यावर पुन्हा इंजिनचं चिन्हं आणलं आहे. दरम्यान, हे चिन्हं लोकांच्या नजरेसमोर नेहमी असले पाहिजे. त्यासाठी मनसेने झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह घेतल्याचे म्हटले आहे. दरम्यान, चिन्हं आणि विचारधारा मतदारांपर्यंत वारंवार गेली पाहिजे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा आहे.

 

 

Web Title :- Rajmudra On MNS Flag | MNS chief raj thackeray rajmudra on mns flag is not illegal testimony given by famous lawyer asim sarode

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला काही तास शिल्लक, मुंबई पोलिसांकडून कारवाईला सुरुवात; 15000 हजार MNS कार्यकर्त्यांना नोटीस देऊन मुंबई सोडण्याचे दिले आदेश

Dilip Walse Patil | … तर कठोर पावले उचला; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे पोलिसांना आदेश

MNS on Ajit Pawar | ‘अजित पवार सुपारीबाज, तुमच्यासारखे टोप्या घालून राजकारण करत नाही’ – मनसे

 

Related Posts