IMPIMP

Raju Todsam | देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत माजी आमदार राजू तोडसाम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

by nagesh
Raju Todsam | former bjp mla raju todsam joins ncp presence minister jayant patil todsam target bjp leader devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीमधून (NCP) पक्षांतर झाले होते. भाजपमध्ये (BJP) मेगाभरती झाली होती. परंतु विधानसभेच्या निकालानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि भाजपला गळती लागल्याचे पहायला मिळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal district) अर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार (Former BJP MLA) राजू तोडसाम (Raju Todsam) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राजू तोडसाम (Raju Todsam) यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या उपस्थितीत राजू तोडसाम (Raju Todsam) यांनी प्रवेश केला.
आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरु नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच राजू तोडसाम यांच्या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तसेच भाजपमध्ये जुन्या नेत्यांना डावलले जात आहे. त्यातूनच तोडसाम यांच्यासारखा नेता आज आपल्या पक्षात प्रवेश करत आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

म्हणून माझे तिकीट कापले

 

यावेळी राजू तोडसाम म्हणाले, मी भाजपमध्ये दहा वर्षे काम केली. सर्वांना सोबत घेऊन गेलो. 2014 साली आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
सत्ताधारी पक्षात काम करत असलो तरी विधानसभेत जयंत पाटील यांचे भाषण आवर्जून ऐकायचो. विरोधकांनाही मी मानसन्मान देत होतो.
तसेच आदिवासींच्या (tribal) प्रश्नावर वारंवार आवाज उचलत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझे तिकीट 2019 च्या निवडणुकीत कापले, असा आरोप तोडसाम यांनी केला.

 

मला ईडीची चिंता नाही

 

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस यांनी मला बोलावून पक्षात थांबायला सांगितले.
मात्र, मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजप सोडत असताना माझ्या मागे ईडी (ED) लागेल याची मला चिंता नाही.
मी आदिवासी माणूस असून माझ्याकडे काहीच नाही. चौकशी केली तरी काही सापडणार नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यावेळी पुसद विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक (Indranil Naik), अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik),
माजी आमदार संदीप बाजोरीया (Sandeep Bajoria), प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आदी उपस्थित होते.

 

Web Title : Raju Todsam | former bjp mla raju todsam joins ncp presence minister jayant patil todsam target bjp leader devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Digital Life Certificate | पेन्शन मिळण्यात येईल अडथळा, असा जनरेट करा डिजिटल हयातीचा दाखला; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

Girish Mahajan | ‘भाजपात आलं की दुसरीकडं संसार करण्याची इच्छा होत नाही’ – गिरीश महाजन

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 43 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts