IMPIMP

Rakhi Sawant | आपल्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या शर्लिन चोप्राला राखी सावंतने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाली…

by nagesh
 Rakhi Sawant | rakhi sawant reaction on police arrest over sherlyn chopra complaint

सरकारसत्ता ऑनलाईन  – ड्रामा क्वीन राखी सावंतला (Rakhi Sawant) दोन दिवसांपूर्वी मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली होती. राखीविरोधात मॉडेल शर्लिन चोप्रानं तक्रार दाखल केली होती. राखीने मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राखीचा (Rakhi Sawant) अटकपूर्व जामीन हि फेटाळण्यात आला होता. अटक केल्यानंतर पोलिसांनी राखीची दिवसभर चौकशी केली होती. त्यानंतर तिची सुटका करण्यात आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यात चाललेल्या घडामोडीमुळे चर्चेत आहे. आधी तिची आई आजारी , त्यानंतर तीच लग्न आणि ती प्रेग्नन्ट असल्याची अफवा आता या चर्चा कुठे थांबतात तोपर्यंत तिच्याविरोधात शर्लिन चोप्राची तक्रार आणि पोलिसाची अटक यामुळे राखीच्या आयुष्यात बरेच चढ उतार चालू असल्याचे समोर येते. राखीची आई रुग्णालयात दाखल आहे. तिच्या आईवर कर्करोग व ब्रेन ट्युमरचे उपचार सुरू आहेत. अशातच राखीला अटक झाल्याच्या बातमीने सर्वांना धक्का बसला होता. पण दिवसभर पोलिसांनी राखीची चौकशी केली आणि नंतर राखीला सोडण्यात आलं होतं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राखीने पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीबद्दल बोलताना राखी (Rakhi Sawant) म्हणाली,
“काही लोक मला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ते खूश राहावे अशी मी अल्लाकडे प्रार्थना करते,”
असं राखीने सांगितलं. यावेळी तिने तिच्या आईच्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली.
“आईची प्रकृती मागच्या दोन दिवसांपेक्षा चांगली आहे. आणि तिने डॉक्टरांचे आणि जनतेचे खूप खूप आभार मानले.
दरम्यान, राखी सावंतने पोलीस चौकशीनंतर तिच्या इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली होती.
“जगातील सगळ्यात महागडं द्रव्य म्हणजे अश्रू. अश्रूंमध्ये 1 टक्का पाणी आणि 99 टक्के भावना असतात.
त्यामुळे कोणालाही दुखावण्याच्या आधी दोनदा विचार करा”, असं राखीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant reaction on police arrest over sherlyn chopra complaint

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | पार्थ पवार – शंभूराज देसाई भेटीवर बोलले अजित पवार; म्हणाले…

Maharashtra Politics | शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना धमक्या; विरोधात नर्स संघटनांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार

Pune Crime News | मार्केटयार्डात कोयता गँगचा धुडगुस; मोटारसायकली, हातगाड्याचे नुकसान करुन पसरविली दहशत

 

Related Posts