IMPIMP

RBI कडून 3 सहकारी बँकांवर कारवाई, महाराष्ट्रातील 2 बँकांचा समावेश; तुमचे खाते आहे का या बँकेत ?

by nagesh
RBI | kyc process how to video kyc online at home rbi issue guidlines

नवी दिल्ली : वृत्तसंस्थारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तीन सहकारी बँकांवर (Co-Operative Bank) दंडात्मक कारवाई (Punitive Action) केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) दोन बँकांचा समावेश आहे. आरबीआयच्या (RBI) नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आरबीआयने (RBI) कारवाई केलेल्या बँकांमध्ये मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (The Maharashtra State Co-operative Bank), बेतियामधील नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The National Central Cooperative Bank Limited) आणि नाशिकमधील द नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक (The Nasik Merchant’s Co-operative Bank) यांचा समावेश आहे.

 

आरबीआयने महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला फसवणूक-वर्गीकरण, अहवाल आणि देखरेखीसाठी मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) याबाबत नाबार्डने (NABARD) दिलेल्या निर्देशाचे पालन न केल्याबद्दल 37 लाख 50 हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

 

तर नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले. या सहकारी बँकेने केवायसी नियमांकडे (KYC Rules) दुर्लक्ष केले असल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले. त्यानंतर या बँकेला दोन लाख रुपये आर्थिक दंड ठोठावला. द नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने इतर बँकांसोबत केलेल्या व्यवहाराची माहिती दिली नसल्याने आरबीआयला आढळून आले.

 

ग्राहकांवर काय होईल परिणाम ?

RBI ने केलेल्या या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांच्या अथवा त्यांच्याद्वारे होणाऱ्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही.
रिझर्व्ह बँकेने या सहकारी बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे.
ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नसून व्यवहार सुरळीत सुरु राहणार आहेत.
त्यामुळे ग्राहकांना भीती बाळगण्याची आवश्यकता नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- RBI | rbi imposes monetary penalty on three co operative banks know about these banks

 

हे देखील वाचा :

Pune News | संतांची जयंती, पुण्यतिथी शासकीयस्तरावर साजरी करावी; वारकरी सांप्रदायाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Fasting and Diabetes | डायबिटीजचे रूग्ण उपवास करत असतील तर ‘या’ 5 गोष्टी आवश्य ठेवा लक्षात, ब्लड शुगर राहील कंट्रोल

Deepak Kesarkar | शिवसेना प्रत्येकवेळी शरद पवारांमुळे फुटली, दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप

 

Related Posts