IMPIMP

Restrictions in Maharashtra | ‘महाराष्ट्रात अधिक कडक निर्बंध लागू होणार का?’ अजित पवार म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar has criticized a statement of bjp state president chandrashekhar bawankule over baramati

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Restrictions in Maharashtra | मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत (Corona Virus) वाढ होताना दिसत आहे. दैनंदिन वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे राज्याची चिंता वाढली आहे. वर्षाच्या अखेरही 8 हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) 31 डिसेंबरपासून राज्यात मध्यरात्रीपासून काही कडक निर्बंध लागू केले आहे. यामध्ये सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावणाऱ्यांची संख्या मर्यादित केली गेलीय. नवीन वर्षात कोरोनामुक्त राज्य करण्याचा संकल्प आखत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कठोर निर्बंधाबाबत (Restrictions in Maharashtra) महत्वपुर्ण माहिती दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोरेगाव भिमा (koregaon bhima) येथे अजित पवार यांनी शहीदांना मानवंदना देण्यासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केलीय. रोजची रुग्णसंख्या आणि वाढीचा दर लक्षात घेऊन कठोर निर्बंधांबाबत निर्णय घेतले जातील, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘नव्या वर्षात राज्याला करोनामुक्त करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर टास्क फोर्सची बैठक झाली. साधारण दररोजचा आकडा लक्षात घेऊन किती पटीत रुग्णांची संख्या वाढत आहे, ते बघून त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. पण रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली, तर नाईलाजाने अजून कडक निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर (Maharashtra Government) येऊ शकते. तशी येऊ नये, म्हणून सगळ्यांनी सहकार्य केलं, तर आपल्याला त्यातून मार्ग काढणं सोयीचं आहे. (Restrictions in Maharashtra)

पुढे अजित पवार म्हणाले, ‘उत्साह प्रत्येकालाच असतो. प्रत्येकाला कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हावेत असं वाटतं. पण नवीन आलेला कोरोना वेगाने पसरतो आहे. त्याची नोंद सर्वांनी घ्यावी. जगभरात अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशांत काही लाख रुग्ण रोज सापडत आहेत. दुसऱ्या लाटेची आपण खूप मोठी किंमत मोजलीय. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे कृपा करून नागरिकांनी सहकार्य करावं. आत्ताच का नियम कडक केले, असा आग्रह करू नये.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

‘कालच राज्य सरकारने कोरोनाच्या बाबतीत नवी नियमावली जाहीर केली आहे. कोरोना झपाट्याने वाढतोय.
5 दिवसांचे अधिवेशन आम्ही ठेवलं होतं. पण 5 दिवसांत 10 मंत्र्यांना आणि 20 पेक्षा जास्त आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांनी नियमांचे भान ठेवलं पाहिजे. असं देखील अजित पवारांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Restrictions in Maharashtra | ajit pawar clarifies maharashtra government new rules corona restrictions

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात विषारी औषध पाजून शेळीला मारले; हडपसरमध्ये महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Vaishno Devi Stampede | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ! 12 भाविकांचा मृत्यु, 20 हून अधिक भाविक जखमी

Coronavirus in Maharashtra | धक्कादायक ! महाराष्ट्रातील 10 मंत्र्यांना आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं

 

Related Posts