IMPIMP

Rishabh Pant Injured In Accident | भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; पंत गंभीर जखमी, प्रकृती स्थिर

by nagesh
Rishabh Pant Injured In Accident | indias wicketkeeper rishabh pant injured in accident on delhi dehradun highway

सरकारसत्ता ऑनलाईन – Rishabh Pant Injured In Accident | भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर (Indias Wicketkeeper) बॅट्समन ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारचा हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे तर पंत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हाती आलेल्या माहितीनुसार अचानक कार अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला जाऊन धडकली. हि कार डिव्हायडरला धडकल्यानंतर कारला आग लागली. पंत हा स्वतः गाडी चालवत होता. उत्तराखंडमधील रुरकीजवळ हा अपघात झाला. शुक्रवारी पहाटे 5.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात ऋषभ पंत सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

या भीषण अपघातीच माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rishabh Pant Injured In Accident | indias wicketkeeper rishabh pant injured in accident on delhi dehradun highway

 

हे देखील वाचा :

PM Modi Mother Heeraben Death News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे 100 व्या वर्षी निधन

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला; ‘एकदा मंत्रीमंडळ विस्तार कराचं, उरलेले पण आमदार निघूण…’

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

 

Related Posts