IMPIMP

Riteish Deshmukh | रितेश देशमुख आणि जेनेलियाचा नवा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

by nagesh
Riteish Deshmukh | mister mummy riteish deshmukh and genelias mr mummy will visit on this day

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही जोडी नेहमीच चर्चेत असते. कधी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार केल्यामुळे तर कधी त्यांच्या रिल्समुळे ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर वायरल होत असते. आता रितेश (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया चा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी टिझर आउट करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख घोषित केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘बंटी और बबली’ (Bunty Aur Babli) या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे शाद अली (Shaad Ali) यांनी या नव्या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर मम्मी’ (Mister Mummy) असे चित्रपटाचे नाव असून येत्या 18 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिस्टर मम्मी ची निर्मिती भूषण कुमार (Bhushan Kumar) यांची कंपनी टी सिरीज, कृष्णकुमार अली (Krushnakumar Ali) आणि शिव अनंत (Shiv Aanat) यांनी केली आहे.

 

टि सीरिजच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
चित्रपटाशी घोषणा करताना ट्विटर मध्ये असे लिहिले होते की “तुम्हाला एका अनोख्या प्रवासावर घेऊन
जाणारी आनंदाची बातमी म्हणजेच मिस्टर मम्मी येत्या 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात”.
रितेश आणि जेनेलियाच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सध्या चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

Web Title :- Riteish Deshmukh | mister mummy riteish deshmukh and genelias mr mummy will visit on this day

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी केलेली चूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुरुस्त केली आहे – जयकुमार गोरे

Leslie Phillips Passed Away | हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन

Boney Kapoor | बोनी कपूरने साधला अक्षय कुमारवर निशाणा! म्हणाले ’25-30 दिवसात चित्रपट करणारे…’

 

Related Posts