IMPIMP

RMD Foundation-Janhavi Dhariwal Balan | ‘मॅरेथॉन स्पर्धेत मुलींची संख्या अधिक असल्याचा आनंद’ – जान्हवी धारीवाल बालन

by sachinsitapure
RMD Foundation-Janhavi Dhariwal Balan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – RMD Foundation-Janhavi Dhariwal Balan | कुठल्याही क्षेत्रात मुली मागे राहिलेल्या नाहीत. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या धावपटूंमध्ये ग्रामीण भागातील मुलींची संख्या मोठ्याप्रमाणात पाहायला मिळाले याचाच खूप मोठा आनंद आहे असे मत आर एम डी फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा माणिकचंद ऑक्सिरिचच्या व्यवस्थापकीय संचालिका जान्हवी धारीवाल बालन (RMD Foundation-Janhavi Dhariwal Balan) यांनी रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) येथे आर एम डी फाऊंडेशन द्वारा आयोजित रांजणगाव मॅरेथॉन (Ranjangaon Marathon 2023) स्पर्धेवेळी व्यक्त केले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मागील सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी ग्रामीण भागातील तरुणांना मॅरेथॉन सारख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर एम डी फाउंडेशन द्वारा मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे. त्याचा उपयोग भविष्यात उत्तम धावपटू निर्माण होण्यासाठी नक्कीच होईल अशी भावना आर एम डी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर धारीवाल (Shobha R Dhariwal) यांनी व्यक्त केली. यावेळीच्या मॅरेथॉन मध्ये ५००० पेक्षा जास्त धावपटूंनी सहभागी झाल्याबाबत त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्यात. आयुष्यात कुठलीही गोष्ट ध्येयानी सुरु कराल ते पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील रहा असे मत शिरूर चे खासदार व अभिनेता डॉ अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी मैदानात उभ्या असलेल्या “आय एम अ फिनिशर” या फलकाकडे निर्देश करून धावपटूंना उपदेश केला व स्पर्धकांना प्रोत्साहित केले .

 

रांजणगाव सारख्या ग्रामीण भागात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून शेकडो तरुणांना एकत्रीतपणे आणण्यासाठी व स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी केलेल्या योगदानाबाबत व याठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठी निमंत्रीत केल्याबाबत फाऊंडेशनचे आभार मानतो अशी प्रशंसा सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) यांनी व्यक्त केले. (RMD Foundation-Janhavi Dhariwal Balan)

शेकडो तरुणांनी विशेषतः मुलींनी केलेल्या मागणीवर सैराट मधील नृत्यावर आकाश ठोसर यांनी ठेका घेतला त्यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले होते . मॅरेथॉन स्पर्धेत यश संपादन केलेल्या धावपटूंना मानचिन्ह, रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मागील वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याबाबत व शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे याकरिता 1) बालाजी विश्वविद्यालय शिरूर, 2) मंगलमुर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती 3) ऐंजल इंग्लिश मेडीअम स्कूल बेलवंडी 4) हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्य विद्यालय, आर एम धारीवाल ज्युनिअर & सिनियर अकॅडमी कासारी 5) जि.प. प्राथमिक शाळा कों. चिंचोली या शाळांना पाहुण्यांच्या हस्ते मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत वॉटर कूलर प्रदान करण्यात आले.

मागील सहा वर्षापासून मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजक म्हणून गणपती फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर पाचुंदकर पाटील यांचा यावेळी शोभाताई आर धारीवाल व आकाश ठोसर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी, गणपती फाऊंडेशनचे पदाधिकारी तसेच अतिश राऊत ,विश्वास आबा कोहकडे, स्वप्नील गायकवाड, शेखरदादा पाचुंदकर, मानसिंग पाचुंदकर, विक्रम पाचुंदकर, दत्तात्रय पाचुंदकर, बापूसाहेब शिंदे, उत्तम कुटे, काळुराम पाचुंदकर, संपत पाचुंदकर, मनिषाताई पाचुंदकर, संकेत पाचुंदकर तसेच विविध चॅनेल्स, वृत्तसंकलन करणारे रिपोर्टर, शिक्षक वृंद, विविध संस्थांचे पदाधिकारी व गावकरी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

Related Posts