IMPIMP

RSF Fitness Club | आर.एस.एफ फिटनेस क्लब आता पुण्यात ! सुप्रसिद्ध अभिनेते, बॉडीबिल्डर ठाकूर अनुप सिंग यांच्या हस्ते उद्घाटन

by nagesh
RSF Fitness Club | RSF Fitness Club now in Pune! Inauguration by renowned actor, bodybuilder Thakur Anup Singh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – RSF Fitness Club | जीम इक्विपमेंट (Gym Equipment Supplier in India) मध्ये भारतासह परदेशातही
नावाजलेला आर एस एफ ब्रॅंड आता फिटनेस क्लब (RSF Fitness Club) व्यवसायात कार्यरत झाला आहे. आर एस एफ च्या देशातील दुसऱ्या आणि
महाराष्ट्रातील पहिल्या फिटनेस क्लबचे उद्घाटन आज पुण्यातील पिंपळे सौदागर,रहाटणी येथे सुप्रसिद्ध अभिनेते, बॉडीबिल्डर ठाकूर अनुप सिंग
(Bodybuilder Thakur Anoop Singh) यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

RSF Fitness Club | RSF Fitness Club now in Pune! Inauguration by renowned actor, bodybuilder Thakur Anup Singh

 

यावेळी पुनीत जैन Punit Jain Director RSF Fitness Club (डायरेक्टर, आर. एस. एफ), सोनू जैन (Sonu Jain RSF), आदित्य जैन (Aditya Jain RSF) आदि मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना पुनीत जैन म्हणाले, भारतासह परदेशातही आर एस एफ ब्रॅंडची (RSF GYM) जीम इक्विपमेंट प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रात आम्ही मागील दहा वर्षांपासून कार्यरत असून २ हजार ८०० हून अधिक जीम मध्ये आमची उत्पादने वापरली जातात. आता आम्ही प्रत्यक्ष जीम उभारून एक नवीन पाऊल टाकले आहे. चंदीगड येथे आमची पहिली जीम सुरू करण्यात आली आहे, चंदीगड आणि पुण्यातील ही जीम डायरेक्ट कंपनीच्या मालकीच्या असून आम्ही या व्यवसायात फ्रॅच्यायसी सुरू करणार आहोत त्यासाठीही पुण्यातील हा आमचा फिटनेस क्लब मॉडेल आहे. या फिटनेस क्लब मध्ये फक्त फिटनेसचे धडे मिळणार नाहीत तर त्या पलीकडे जाऊन ‘फिट इंडिया’ मोहीम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. जीम मध्ये असलेल्या ट्रेनर्सचे ट्रेनिंग, त्यांना सर्टिफिकेट कोर्स आम्ही ‘आर एस एफ ट्रेनिंग सेंटर’ या माध्यमातून सुरू करत आहोत, तसेच इथे फिटनेस प्रेमी, अन्य जीम व्यवसायिक यांना आर एस एफ कंपनीचे इक्विपमेंट सुद्धा खरेदी करता येतील. (RSF Fitness Club)

 

अधिक माहिती देताना पुनीत जैन म्हणाले,  आर एस एफ च्या माध्यमातून आता सर्व सुविधा एकत्र दिल्या जाणार आहेत. भविष्यात पुण्यात अन्य भागात व इतर शहरात विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. ‘फिट इंडिया’ ला प्रोत्साहान देण्यासाठी आम्ही अत्यंत वाजवी दरात मासिक आणि वार्षिक मेंबरशिप देत आहोत.

 

या प्रसंगी बोलताना ठाकूर अनुप सिंग म्हणाले, पुण्यात येण्याचा अनुभव नेहमीच सुखद असतो.
माझे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालेले असल्याने या शहराशी माझे एक अतूट नाते निर्माण झालेले आहे.
आज आर एस एफ जीमच्या उद्घाटनासाठी आलोय त्यामुळे फक्त एक गोष्ट सांगेन की तुम्हाला फिट राहायचे
असेल तर जीम करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि त्याला प्रोटिनयुक्त पौष्टिक आहाराची जोड असेल तरच
आपण  फिट राहू शकतो ही बाब लक्षात ठेवा कारण जीम केली आणि आपले डायट व्यवस्थित नसेल तर त्याचा
उपयोग होत नाही , दैनंदिन कामाच्या व्यसतेमुळे आपल्या आहारात सर्व आवश्यक घटकांचा समावेश नसतो
यामुळे सप्लीमेन्ट गरजेचे असतात असेही ठाकूर अनुप सिंग यांनी नमूद केले.
तसेच अभिनयाच्या बाबतीत बोलताना लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : RSF Fitness Club | RSF Fitness Club now in Pune! Inauguration by renowned actor, bodybuilder Thakur Anup Singh

 

हे देखील वाचा :

Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises (PMFME) Scheme | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना: सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून रोजगार निर्मिती !

Pune Crime News | सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांची फसवणूक; आर्थिक नुकसान करण्याची धमकी देऊन खंडणी उकळली

Sangli Accident News | भरधाव कार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Shahid Hemu Kalani | भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts