IMPIMP

Rupee All Time Low | आता 80 पेक्षा सुद्धा खाली घसरला रुपया, पहिल्यांदा झाली अशी बिकट अवस्था

by nagesh
Rupee All Time Low | indian rupee fall at all time low first time below 80 level against dollar other currencies

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Rupee All Time Low | भारतीय चलन ’रुपया’ (INR) साठी हा सर्वात वाईट काळ सुरू आहे. मागील काही काळात रुपयाचे मूल्य (Indian Rupee Value) खूप वेगाने खाली आले आहे. रुपया एकापाठोपाठ एक नवीन खालच्या पातळीवर (Rupee All Time Low) सतत घसरत आहे. मंगळवारी शेअर बाजारातील (Share Market) घसरणीदरम्यान रुपयाने घसरणीचा नवा विक्रम केला. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अलीकडील प्रयत्नांनंतरही, रुपया सावरण्यात सक्षम नाही आणि मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात डॉलर (USD) च्या तुलनेत प्रथमच तो 80 च्या खाली गेला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या वर्षी आतापर्यंत इतकी घसरण
इंटरबँक फॉरेक्स एक्स्चेंज (Interbank Forex Exchange) च्या व्यवहारात, रुपया सुरुवातीला घसरला आणि डॉलरच्या तुलनेत 80 च्या खाली खुला झाला. रुपयासाठी 80 ची पातळी हा महत्त्वाचा सायकॉलॉजीकल सपोर्ट मानला जात होता.

 

अनेक दिवसांपासून वाटत होते की, रुपया ही पातळी तोडून घसरणीचा नवा विक्रम प्रस्थापित करू शकेल. आकडेवारीवर नजर टाकली तर, या वर्षात आतापर्यंत रुपया 7 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. आज तो सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत 80.0175 वर व्यवहार करत होता. यापूर्वी सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 79.9775 वर बंद झाला होता. (Rupee All Time Low)

 

8 वर्षात 25% घसरला रुपया
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. सध्या प्रमुख चलनांच्या बास्केटमध्ये डॉलरच्या सततच्या मजबूतीमुळे रुपयाची स्थितीही कमकुवत झाली आहे. जवळपास दोन दशकांनंतर, डॉलर आणि युरोचे मूल्य समान झाले आहे, तर युरो (Euro) सातत्याने डॉलरच्या वर राहिला आहे. भारतीय रुपयाबद्दल बोलायचे झाले तर डिसेंबर 2014 पासून आतापर्यंत तो डॉलरच्या तुलनेत सुमारे 25 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

 

वर्षभरापूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपया 74.54 च्या पातळीवर होता. कच्च्या तेलाच्या (Crude Oil Prices) किमतीत झालेली वाढ आणि रशिया आणि युक्रेनमधील (Russia-Ukraine War) अनेक महिने चाललेले युद्ध हे नुकतेच रुपयाच्या घसरणीचे कारण असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डॉलरच्या तुलनेत घसरली ही चलने
इतर अनेक देशांचे चलन भारतीय रुपयापेक्षा जास्त घसरत असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले होते.
त्या म्हणाल्या होत्या, ब्रिटिश पाउंड (British Pound), जपानी येन (Japanese Yen)
आणि युरो यांसारखी चलने डॉलरच्या तुलनेत रुपयापेक्षा जास्त कमकुवत झाली आहेत.
यामुळेच 2022 मध्ये ब्रिटिश पाउंड, जपानी येन आणि युरो यांसारख्या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाला आहे.

 

या कारणांमुळे वाढत आहे डॉलरचा भाव
वास्तविक, बदलत्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगावर मंदीचा धोका निर्माण झाला आहे.
अमेरिकेतील महागाई (US Inflation) 41 वर्षांच्या उच्चांकावर आहे.
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह वेगाने व्याजदर वाढवत (Federal Reserve Rate Hike) आहे.
महागाईच्या ताज्या आकडेवारीनंतर अमेरिकेतील व्याजदरात एक टक्का वाढ होण्याची शक्यता बळावली आहे.

 

अमेरिकेत वाढत्या व्याजदराचा फायदा डॉलरला मिळत आहे. मंदी (Recession) च्या भीतीने परकीय गुंतवणूकदार
उदयोन्मुख बाजारातून पैसे काढून घेत आहेत आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलर खरेदी करत आहेत.
या घटनेमुळे अनपेक्षित पद्धतीने डॉलर मजबूत झाला आहे.
या कारणास्तव, अनेक दशकांनंतर प्रथमच, डॉलर आणि युरो (Euro) जवळजवळ समान झाले आहेत, युरो हे डॉलरपेक्षा महाग चलन होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Rupee All Time Low | indian rupee fall at all time low first time below 80 level against dollar other currencies

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर बलात्कार, फेसबुकवर झाली होती ओळख

GST | केंद्राकडून सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी दही, लस्सी वरील GST मागे, निर्मला सीतारामन यांची घोषणा

 

 

Related Posts