IMPIMP

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा सलग दुसरा विजय; माणिकचंद ऑक्सिरीच संघाची विजयी सलामी !!

by nagesh
S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak' Championship T20 Cricket Tournament; Punit Balan Group team's second win in a row; Manikchand Oxyrich team's winning salute !!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20
League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने (Punit Balan Group Team) सलग दुसरा विजय मिळवला.
माणिकचंद ऑक्सिरीच संघाने (Manikchand Oxyrich Team) आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. (S. Balan Cup
T20 League)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर (Shinde High School Ground, Sahakarnagar) सुरू असलेल्या या स्पर्धेत सागर सावंत याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने इऑन वॉरीयर्स संघाचा (Aeon Warriors team) ७ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुप संघाने १५१ धावांचे आव्हान उभे केले. धीरज फटांगरे याने ६० धावांची खेळी केली. मेहूल पटेल (३७ धावा) आणि सिद्धार्थ म्हेत्रे (नाबाद ३० धावा) यांनी दुसर्‍या बाजूने अचूक साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना इऑन वॉरीयर्स संघाचा डाव १४४ धावा मर्यादित राहीला. सागर सावंत याने १८ धावात ४ गडी बाद करून इरॉन संघाचा डावाला खिंडार पाडले. (S. Balan Cup T20 League)

अक्षय जाधव याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने इव्हॅनो इलेव्हन संघाचा १५ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. ऋषभ राठोड (३५ धावा), अक्षय जाधव (२३ धावा) आणि हर्ष सांगवी (२२ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने २० षटकामध्ये १४७ धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाला उत्तर देताना इव्हॅनो इलेव्हन संघाचा डाव १३२ धावांवर मर्यादित राहीला. जय डी. याने ४५ धावांची खेळी केली. अक्षय जाधव याने गोलंदाजीमध्येही चमक दाखवित संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
माणिकचंद ऑक्सिरीचः २० षटकात ८ गडी बाद १४७ धावा (ऋषभ राठोड ३५, अक्षय जाधव २३, हर्ष सांगवी २२, ऋषीकेश जाधव ३-३०) वि.वि. इव्हॅनो इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद १३२ धावा (जय डी. ४५, शिवराज शिंदे २६, अक्षय जाधव १-३४); सामनावीरः अक्षय जाधव;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

पुनित बालन ग्रुपः १८ षटकात ७ गडी बाद १५१ धावा (धीरज फटांगरे ६० (३४, ५ चौकार, ४ षटकार), मेहूल पटेल ३७, सिद्धार्थ म्हेत्रे नाबाद ३०, रेहान खान ४-३४) वि.वि. इऑन वॉरीयर्सः १७.२ षटकात १० गडी बाद १४४ धावा (कृष्णा ठाकूर २५, कश्यप बाकले २२, सागर सावंत ४-१८, आतिश कुंभार २-३२); सामनावीरः सागर सावंत;

 

Web Title : S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament; Punit Balan Group team’s second win in a row; Manikchand Oxyrich team’s winning salute !!

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना दिलासा, ‘मशाल’ चिन्हा बाबतची समता पक्षाची याचिका फेटाळली

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एलके इलेव्हन संघाचा दुसरा विजय; स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने उघडले विजयाचे खाते

Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटीची खंडणी मागणार्‍या दोघांना अटक; कोल्हापूरच्या गडहिंग्जलमधील एकाचा समावेश (Video)

 

Related Posts