IMPIMP

Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना दिलासा, ‘मशाल’ चिन्हा बाबतची समता पक्षाची याचिका फेटाळली

by nagesh
Uddhav Thackeray | Supreme Court's relief to Uddhav Thackeray, Samata Party's plea regarding 'Mashal' symbol rejected

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – Uddhav Thackeray | केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission (ECI)  शिवसेना (Shiv Sena) हे
नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय
जाहीर केला. त्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri by-Election) पूर्वी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना
‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ (Mashal) चिन्ह दिले. मात्र, ठाकरे गटाला (Thackeray Group) दिलेल्या मशाल चिन्हावर
समता पार्टीने (Samta Party) दावा केला. तसेच याबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

निवडणूक आयागाने ठाकरे गटाला दिलेल्या मशाल चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत राजकीय संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला दिलासा दिला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलं होतं. त्याची मुदत सोमवारी (दि.27) संपणार होती. त्यापूर्वीच समता पार्टीने या मशाल चिन्हावर दावा करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु कोर्टानं पुढील आदेशापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे मशाल हे चिन्ह राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

 

ठाकरेंना नवं नाव आणि चिन्ह मिळणार?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अंधेरी पोटन निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवत शिंदे आणि ठाकरे गटला वेगवगळं नाव आणि चिन्ह दिलं होतं. त्यानंतर शिंदे गटाला शिवसेना मिळाल्यानंतर ठाकरे गटानं नाव आणि चिन्ह अद्याप बदलले नाही. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून नवं नाव आणि चिन्ह दिलं जाणार आहे.

 

Web Title : Uddhav Thackeray | Supreme Court’s relief to Uddhav Thackeray, Samata Party’s plea regarding ‘Mashal’ symbol rejected

 

हे देखील वाचा :

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एलके इलेव्हन संघाचा दुसरा विजय; स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने उघडले विजयाचे खाते

Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटीची खंडणी मागणार्‍या दोघांना अटक; कोल्हापूरच्या गडहिंग्जलमधील एकाचा समावेश (Video)

Nashik News | डाळिंब पिकाने घेतली उड्डाणे; आधुनिक शेतीचे गाव ‘सातमाने’

 

Related Posts