IMPIMP

Sadabhau Khot | सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, म्हणाले – ‘राज्यकर्ते म्हणजे रेड्याची अवलाद’

by nagesh
Sadabhau Khot | sadabhau khot controversial statement about rulers and political people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्यकर्ते म्हणजे रेड्याची अवलाद असतात. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल, तर आपल्याला संत ज्ञानेश्वरांसारखा त्यांच्या पाठीवर हात ठेवावा लागेल, असे वक्तव्य सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केले आहे. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) पुण्यात एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यात नवी पेठेतील पत्रकार संघात ‘वास्तव कट्टा’ आणि ‘अर्हम फाउंडेशन’ यांच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसाठी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सदाभाऊ खोत, माजी मंत्री आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार अभिमन्यू पवार आदी मान्यवर उपस्थि होते. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधीत करताना सदाभाऊ खोत बोलत होते. खोत म्हणाले, दरवर्षी राज्यव्यापी विद्यार्थी अधिवेशन आयोजित केले पाहिजे. राज्यकर्त्यांना सर्वांत जास्त गरज डोक्यांची असते. जिकडे जास्त डोकी, तिकडे राज्यकर्ते जास्त बोलतात. कारण, राज्यकर्ते हे रेड्याची औलाद आहेत. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल, तर आपल्याला संत ज्ञानेश्वरांसारखा त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलणार नाहीत. तसेच त्यांना डोकी जास्त दिसली, तर ते तुम्हाला नको असलेलेही बोलून दाखवतात.

 

देशात सरकार कोणाचेही असले, तरी भ्रष्टाचार प्रचंड आहे.
पैसे देणारा तरुण पुढे जातो आणि अभ्यास करणारा तरुण मागे राहतो. भ्रष्टाचार कसा संपुष्टात येईल,
याकडे लक्ष पुरवले पाहिजे. आज देशात आणि राज्यात बेरोजगारीशिवाय दुसरा प्रश्न काय आहे? बेरोजगारी हा सरकारच्या अजेंड्यावरील विषय असायला हवा, असे यावेळी खोत यांनी नमूद केले.

 

 

Web Title :- Sadabhau Khot | sadabhau khot controversial statement about rulers and political people

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमीचा दुसरा विजय; इव्हॅनो इलेव्हन संघाने गुणांचे खाते उघडले

Aditya Thackeray | मंगलप्रभात लोढांच्या विधानाची टीका करणाऱ्यांमध्ये आदित्य ठाकरेंची भर; ट्विटद्वारे म्हणाले, “गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं म्हणजे…”

Virat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर

 

Related Posts