IMPIMP

Sakinaka Rape Murder Case | साकीनाका बालात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय

by nagesh
Pune Crime News | The district and sessions court granted bail to the accused in the murder even before the charge sheet was filed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्येप्रकरणी (Sakinaka Rape Murder Case) आरोपी मोहन चौहानला (Accused Mohan Chauhan) न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली (Sentenced to Death) आहे. आरोपी चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi Sessions Court) ही शिक्षा सुनावली. हे प्रकरण (Sakinaka Rape Murder Case) दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत राज्य सरकारच्या (State Government) वतीने आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जलद गतीने तपास अन् आरोपीला शिक्षा

साकीनाका बलात्कार आणि खून प्रकरणाचा (Sakinaka Rape Murder Case) जलद गतीने करत केवळ एका वर्षाच्या आत निकाल लावण्यात आला. गुणेश चतुर्थीच्या (Gunesh Chaturthi) दिवशी मुंबईत घडलेल्या या प्रकरणामुळे मुंबई हादरली होती. या गुन्ह्यातील आरोपी मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांच्या आत अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांन न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीने चालविण्यात येईल असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन आरोपपत्र (Charge Sheet) दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केले.

 

मुंबई पोलिसांनी 346 पानांच्या या आरोपपत्रातील महितीनुसार, पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीने महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा नराधम आरोपीने रागाच्या भरात तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळईचाही त्याने वापर केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हे कृत्य पूर्वनियोजीत नव्हते असा निष्कर्ष काढत पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास वेगाने केला. या आरोपपत्रात एकूण 37 जणांचे जबाब नोंदवले असून ॲट्रॉसिटी (Atrocity), बलात्कार (Rape) आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय (Medical), भौतिक (Physical) आणि रासायनिक (Chemical) असे सर्व पुरावे (Evidence) जमा करुन तपास पूर्ण करण्यात आला असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. याच आधारावर आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवत असल्याचं सोमवारी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले असून बुधवारी (दि.1) मोहनच्या शिक्षेवर युक्तिवाद झाला.

 

काय आहे प्रकरण?

मागील वर्षी ऐन गणेशोत्सवात मुंबई येथील साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते.
10 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री एक 32 वर्षीय महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी आढळून आली.
तिला राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) दाखल करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
डॉक्टरांच्या अथक प्रत्नानंतरही 11 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तासांच्या आतच
मुंबई पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या. मोहनवर आयपीसीच्या विविध कलमांसह बलात्कार,
हत्या, ॲट्रॉसिटी, जाणीवपूर्वक गंभीर मारहाण यासह हत्यार कायद्यानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
अवघ्या 18 दिवसांत पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Sakinaka Rape Murder Case | sakinaka rape murder case accused mohan chauhan sentenced to death for sakinaka rape and murder

 

हे देखील वाचा :

Home Loans Become More Expensive | कर्जदारांना झटका ! गृहकर्जाच्या व्याजदरात पुन्हा वाढ

CM Uddhav Thackeray | औरंगाबाद पाणीप्रश्नावरून CM उद्धव ठाकरेंचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश; म्हणाले – ‘मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा’

Benefits Of Drumstick Leaves | सकाळी उठल्या-उठल्या ‘Drumstick’ची पाने खाल्ल्याने होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

 

Related Posts