IMPIMP

Sambhajiraje Chhatrapati | समर्थकांची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी ! संभाजीराजे छत्रपती म्हणाले…

by nagesh
Sambhajiraje Chhatrapati | sambhajiraje chhatrapati reaction after his supporters put banners outside shivsena bhavan after rajyasabha election 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवरून शिवसेना (Shivsena) आणि संभाजीराजे
(Sambhajiraje Chhatrapati) यांच्यातील मतभेद खुपच ताणले गेले आहेत. शिवसेनेने संभाजीराजे यांना डावलून उमेदवारी कोल्हापूरचे शिवसेना
जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना दिली. मात्र पवार हे पराभूत झाले आहेत. संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांचे राज्यसभेवर निवडून जाण्याचे स्वप्न पूर्ण न होऊ शकल्याने त्यांचे समर्थक सुद्धा नाराज झाले आहेत. या समर्थकांनी शिवसेना भवनाबाहेर (Shivsena Bhavan) बॅनर लावून सेनेला डिवचले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय लिहिले होते बॅनरवर…
संभाजीराजे यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनासमोर लावलेल्या बॅनरवर लिहिले आहे की,…आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj). शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणार्‍या सर्व आमदार (MLA) ’मावळ्यांचे’ जाहीर आभार…राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे 2024 अभी बाकी है…जय शिवराय.

 

 

हे माझ्या तत्वात बसत नाही
या प्रकारानंतर संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी समर्थकांना संयम बाळगण्यास सांगितले आहे. बॅनरबाजीनंतर संभाजीराजे भोसले यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स (Flex) लावले, त्यांच्या प्रेमाचा मी आदरच करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो तरी ’स्वराज्य’ ला तत्वांची बैठक असेल.

 

शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने संभाजीराजे नाराज झाले आहेत, यापूर्वी सुद्धा त्यांनी आपली नाराजी ट्विटमधून व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी अभंगाचे दोन ओळी ट्विट केल्या होत्या. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ॥. याचा अर्थ वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही, असा होता. संभाजीराजे यांनी अभंगाचा वापर करत थेट शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | sambhajiraje chhatrapati reaction after his supporters put banners outside shivsena bhavan after rajyasabha election 2022

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | मामे भावाकडून 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार !

Vidhan Parishad Election | राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत झटका देण्याच्या तयारीत भाजप, ‘या’ दोन नेत्यांचा गेम होणार !

Diabetes | वैयक्तिक नातेसंबंधात अडथळा बनू शकतो ‘हा’ आजार, खाणे-पिण्याची घ्या विशेष काळजी

 

Related Posts