Sangli Crime | धक्कादायक ! मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी घेतला एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन– Sangli Crime | मुलीच्या आकस्मिक मृत्यूच्या घटनेने अस्वस्थ झालेल्या आई-वडिलांनी गळफास (Suicide)
घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही धक्कादायक घटना सांगलीच्या (Sangli Crime) आटपाडी तालुक्यातील राजेवाडीत घडली आहे. दोन
दिवसांपूर्वी झालेल्या मुलीच्या मृत्यूमुळे आई-वडिलांनी देखील आत्महत्या केली आहे. करण हेगडे (Karan Hegde), (वय 28) आणि शीतल हेगडे (Sheetal Hegde), (वय 22) असं या माता-पित्यांचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबत माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी हेगडे दाम्पत्याची 2 वर्षांच्या मुलीच्या घशात खाऊचा पदार्थ अडकला होता. ज्यातून मुलीचा मृत्यू (Died) झाला. या दरम्यान मुलीची झालेली तडफड पाहून हेगडे दाम्पत्य हे अस्वस्थ झाले होते. त्यामुळे माता-पित्याने आपलंही आयुष्य संपवलं आहे. राजेवाडी येथील काणबुनाथ मंदिरासमोर असणाऱ्या एका झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन हेगडे दांपत्याने आत्महत्या केली. (Sangli Crime)
मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत माहिती समजताच आटपाडी पोलिसांनी (Atpadi Police) घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. मुलीचा झालेला मृत्यू हा सहन झाला नाही. यातूनच आम्ही आत्महत्या करत असून याला कोणीही जबाबदार नाही, असा मजकूर या चिठ्ठीत लिहिल्याचं आटपाडी पोलिसांनी सांगितलं.
Web Title :- Sangli Crime | death of the unborn child was not tolerated the parents committed suicide in sangli
Pune Crime | बोपदेव घाटात दाम्पत्याला लुटले, तलवारीने वार करुन मोबाईल, मंगळसुत्र लुबाडले
Pune Rain | अखेर तो आला ! खडकवासला धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात
Comments are closed.