IMPIMP

Sanjay Raut | ‘कारागृहात माझे 10 किलो वजन कमी झाले’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut used the wrong word for bjp leader narayan rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   कथित गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) अटक केली होती. त्यांची सुनावणी विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयात सुरु आहे. सध्या त्यांची न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता आपले तुरुंगातील अनुभव सांगितले आहेत.

 

मला कारागृहात ‘अंडा सेलमध्ये’ ठेवण्यात आले होते. तिथे मला पंधरा दिवस ऊन दिसले नाही. म्हणजे ती एक प्रकारची अंधार कोठडी होती. तुरुंगात बराच वेळ फ्लड लाइटस‌्च्या संपर्कात राहिल्याने माझी दृष्टी कमी झाली आहे. तसेच या काळात माझे दहा किलो वजन कमी झाले, असे संजय राऊत यांनी सांगितले. जर मी भाजपसमोर आत्मसमर्पण केले असते किंवा मूक दर्शक झालो असतो, तर त्यांनी मला अटक केली नसती. मी स्वत: ला युद्धकैदी समजतो. सरकारला वाटते की, आम्ही त्यांच्यासोबत युद्ध करत आहोत, असेही राऊत म्हणाले. मी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना देखील कारागृहात पाहिले. त्यांची प्रकृती ठीक नाही. सरकार केवळ विरोधी पक्षात असणाऱ्यांना तुरुंगात डांबणार का? असा प्रश्न यावेळी राऊतांनी उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सक्तवसुली संचलनालयाने (ED) राऊत यांनी जुलै 2022 मध्ये अटक केली होती.
तेव्हापासून ते मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांनी जामीनासाठी अर्ज देखील केला होता.
पण त्यावर सुनावणीस वेळ लागला. अखेर आठवड्याभरापूर्वी राऊत यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
त्यांना जामीन देताना न्यायालयाने ईडीच्या कामावर ताशेरे ओढले. राऊत यांची अटक बेकायदा होती.
संचलनालयाने त्यांच्या अधिकारांचा गैरफायदा घेतला, असे न्यायालयाने निरीक्षणात नोंदविले आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | i was kept in an egg cell in prison lost 10 kg sanjay raut told about the incident in the jail

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जळगावमध्ये व्यावसायिकाची 12 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

Riteish Deshmukh | अभिनेता रितेश देशमुखने भारत जोडो यात्रेदरम्यानचा फोटो केला ट्वीट ; पोस्ट Viral

Chagan Bhujbal | ‘राहुल गांधींनी हा मुद्दा टाळला पाहिजे, त्यांच्यासमोर इतरही प्रश्न आहेत’ – छगन भुजबळ

5G Internet | Airtel घेऊन आली पुणेकरांसाठी 5G सेवा; सध्या ‘इथे’ मिळणार 5G नेटवर्क

 

Related Posts