IMPIMP

Sanjay Raut On ED And CBI | ‘पाकिटमारीचा तपास ईडी आणि CBI कडून व्हायचा बाकी’ – संजय राऊत

by nagesh
MP Sanjay Raut | thackeray group leader sanjay rauts reaction on the disagreement in mahavikas aghadi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut On ED And CBI | सत्ताधारी नेत्यांवर किंवा त्यांच्या नातेवाईकांवर कारवाई होताना दिसत आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडालेली पाहायला मिळाली. सतीश उके (Satish Uke) यांना ईडीने ताब्यात घेतल्यावर महाविकास आघाडीमधून (Maha Vikas Aghadi) भाजपवर (BJP) टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut On ED And CBI) यांनीही केंद्रीय तपास यंत्रणांना टोला लगावला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील. त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल तर महाराष्ट्राचे पोलीस (Maharashtra Police) तपास करतील. ईडीने येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा उकेंनी केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं राऊत म्हणाले. त्यासोबतच, आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय (CBI) आणि ईडीकडून (ED) व्हायचा बाकी, असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. (Sanjay Raut On ED And CBI)

 

काश्मीरमध्ये (Kashmir) ज्या प्रकारे अतिरेकी अचानक घुसतात आणि बॉम्ब हल्ले (Bomb Attacks) करून पळून जातात. त्याप्रकारे केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत, कारण तपास यंत्रणांना घुसवलं जात आहे ते अटक करून निघून जातात. यातून जर संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल म्हणून पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपशासित नसलेल्या राज्यांना पत्र पाठवलं असून सर्वांनी एकत्र येण्याची त्यांची भूमिका याच गोष्टीसाठी असल्याचं राऊतांनी सांगितलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, लोकांनी फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गडकरींवर (Nitin Gadkari) खोट्या तक्रारी दाखल केल्या असं ते म्हणतात.
त्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. पश्चिम बंगाल पोलीस तपास करतील, झारखंडचे पोलीस अशा गुन्ह्यांचे तपास करतील.
त्यासाठी ईडी आणि सीबीआयने येण्याची गरज नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sanjay Raut On ED And CBI | Shivsena leader and MP sanjay raut attacks bjp over ed action against satish uke

 

हे देखील वाचा :

Rajesh Tope | मास्कमुक्ती झाली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावायचं की नाही?; आरोग्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकमध्ये पैसे गुंतवल्यास मिळेल भरघोस परतावा; जाणून घ्या

Pak PM Imran Khan | राजकीय उलथापालथ सुरु असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका?; सुरक्षेत केली वाढ

 

Related Posts