IMPIMP

Rajesh Tope | मास्कमुक्ती झाली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावायचं की नाही?; आरोग्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

by nagesh
Maharashtra Corona Restrictions | Maharashtra Mumbai Corona Update Restrictions And Masks Enforced In The State Again See What The Health Minister Rajesh Tope Says

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rajest Tope | राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या (Maharashtra State Government)
गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र आता निर्बंधमुक्त (Unrestricted) झाला आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी मास्क
(Mask) वापरायचं की नाही ?, याबाबत काहींना अद्यापही संभ्रम आहे. अशातच यावर राज्याचे आरोग्यमंत्री (Minister of Health) राजेश टोपे
(Rajesh Tope) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सार्वजनिक ठिकाणी (Public Place) आता नागरिकांना मास्क घालणं हे त्यांच्या इच्छेनुसार आहे मात्र बंधनकारक नाही. परंतु जरी निर्बंध हटवण्यात आले असले तरी नागरिकांनी एकदम बिंधास्तपणे वागू नये, असा सल्लाही राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सर्वांना दिला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

कोरोनाच्या (Corona) काळात खबरदारी म्हणून संसर्ग पसरू नये यासाठी राज्यात एपिडमिक ॲक्ट (Epidemic Act) आणि डिझास्टर ॲक्ट (Disaster Act) लागू करण्यात आला होता. त्यानूसार राज्यभर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली होती. आता हे दोन्ही ॲक्ट रद्द करण्यात आले. त्यामुळे कायद्यांखालील सर्व निर्बंधही रद्द झाले असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यासोबतच त्यांनी यावेळी बोलताना आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी (Health Workers) एक मोठी घोषणा केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, 40 ते 50 या वयोगटातील 22 लाख कर्मचाऱ्यांची दोन वर्षातून एकदा आरोग्य चाचणी होणार आहे.
तर 50 ते 60 या वयोगटातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही वर्षातून एकदा आरोग्य चाचणी बंधनकारक (Health Testing is Mandatory) आहे.
यासाठी 105 कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचं टोपेंनी सांगितलं.

 

Web Title :- Rajesh Tope | mask restrictions no mask is mask compulsory in maharashtra health minister rajesh tope give explanation

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकमध्ये पैसे गुंतवल्यास मिळेल भरघोस परतावा; जाणून घ्या

Pak PM Imran Khan | राजकीय उलथापालथ सुरु असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका?; सुरक्षेत केली वाढ

Pune News | देहूमध्ये मांस, मच्छीवर बंदी ! नियमांचं पालन न केल्यास कारवाई !

 

Related Posts