IMPIMP

Sanjay Raut On Gajanan Kirtikar | ‘शिवसेनेत सर्व काही भोगून किर्तीकर गेले, जाऊद्या, लोक उद्या त्यांना…’ – खा. संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut On Gajanan Kirtikar | shivsena mp gajanan kirtikar joined eknath shinde group sanjay raut shivsena slams

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  –  Sanjay Raut On Gajanan Kirtikar | शिवसेनेच्या उर्वरीत सहा खासदारांपैकी एका खासदाराने शुक्रवारी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) शिंदे गटात समील झाले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेकडे असलेल्या खासदारांची संख्या 5 राहिली आहे. गजानन किर्तीकर यांच्या पक्षाला राम राम केल्यामुळे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. किर्तीकर गेल्याने काही मोठा फरत पडला नाही. उद्या लोक त्यांना विसरुन जातील, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut On Gajanan Kirtikar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गजानन किर्तीकर पक्षातील ज्येष्ठ नेते होते. या वयात पक्षाने त्यांना सर्वकाही देऊ केले. तरी ते गेले. किर्तीकर पाच वेळा आमदार होते. दोनही मंत्रिमंडळात ते मंत्री होते. पक्षाकडून त्यांना दोन वेळा खासदारकीचे तिकीट मिळाले. त्यांचे चिरंजिव अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) कडवट शिवसैनिक आहेत. आणि ते आमच्यासोबत आहेत. किर्तीकरांनी सर्व काही भोगलेले आहे. त्यामुळे किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. यामुळे फार काही सळसळ झाली नाही. ठीक आहे ते गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. 18 पैकी 13 तिकडे गेल्याने पक्षाला काही मोठा फरक पडला नाही. त्यांना परत निवडून यायचे आहे. ते परत कसे निवडून येतात, ते बघू ना, असे संजय राऊत म्हणाले.

 

शिवसेनेत बंड झाल्यापासून आतापर्यंत 40 आमदार आणि 13 खासदार शिंदे यांच्या गटात गेले आहेत.
त्यामुळे शिवसेनेला उतरती कळा लागली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांच्याकडे केली होती. पण त्यांनी आमचे एकले नाही. त्यामुळे आम्ही पक्ष सोडल्याचे किर्तीकर म्हणाले.
शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत किर्तीकर यांनी शिंदे गटात
जाहीर प्रवेश केला.मात्र या सर्वातील विरोधाभास म्हणजे गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अद्याप
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. तसेच दोघांमध्ये (पिता-पुत्र) मतभेद देखील आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut On Gajanan Kirtikar | shivsena mp gajanan kirtikar joined eknath shinde group sanjay raut shivsena slams

हे देखील वाचा :

Manasi Naik | घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

Navi Mumbai ACB Trap | 2 लाखाची लाच घेताना महिला तहसीलदार मीनल दळवी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Girish Mahajan | गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना इशारा; म्हणाले “त्यांचेही कारणामे लवकरच जगासमोर…”

 

Related Posts