IMPIMP

Sanjay Raut | पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना दिलासा नाहीच; कोठडीत पुन्हा वाढ

by nagesh
Sanjay Raut | court once again denied bail to shivsena mp sanjay raut

मुंबई: सरकारसत्ता ऑनलाइनकथित पत्राचाळ घोटाळा (Goregaon Patrachal Scam) प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे प्रवक्ते आणि
खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी (Judicial
Custody) आज संपली असताना, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने संजय राऊतांच्या (Sanjay Raut) कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गोरेगाव येथील कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ED) राऊतांना 31 जुलै रोजी अटक केली होती. त्यावर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. राऊतांनी (Sanjay Raut) याप्रकरणी जामीन मिळविण्यासाठी अर्ज देखील केला होता. पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे आज त्यांच्या जामीन अर्जावर (Bail Application) सुनावणी पार पडून त्यांना पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे.

 

पत्राचाळीच्या पुर्नविकासासाठी असलेला भुखंड राऊतांचे बंधू प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनी आपल्या गुरुआशिष कंपनीच्या नावाने केला आणि त्यातून त्यांनी 1039 कोटींचा घोटाळा केला. सदर रक्कम त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर त्यांच्या बँक खात्यात टाकली, असे आरोप ईडीने केले आहेत.

 

काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या बँक खात्यावर देखील आली होती. त्यामुळे राऊत यांची चौकशी सुरु आहे. न्यायालयात ईडीने (Enforcement Directorate) त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवले आहे.

 

दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाच्या आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर ठोस भूमिका घेत निर्णय दिला आहे.
आयोगाने शिवसेना पक्ष नावासह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) हे चिन्ह देखील गोठविले आहे.
त्यामुळे आता कोणत्याही गटास शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह वापरता येणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या पक्षांची नावे आणि चिन्हे गोठविली गेली, ते पक्ष पुढे गेले आणि त्यांनी प्रगती केली.
त्यामुळे शिवसेना देखील खूप पुढे जाणार आहे, असे राऊत म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | patra chawl land scam case judicial custody of shivsena leader sanjay raut extended till 17th october

 

हे देखील वाचा :

Shivsena | हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावले, आमदार रवी राणा यांची टीका

Eknath Khadse | पक्षप्रमुख म्हणून चुका होतात, पण चूक एवढी मोठी नसावी ज्यामुळे पक्षच संपावा, एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandni Chowk | चांदणी चौकातील वाहतूक रात्री अर्ध्या तासासाठी बंद राहणार

 

Related Posts