IMPIMP

Shivsena | हनुमान चालिसेला विरोध केल्यानेच प्रभू श्रीरामांनी ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावले, आमदार रवी राणा यांची टीका

by nagesh
Ravi Rana | uddhav thackeray call to suppress umesh kolhe murder case ravi rana allegation shambhuraj desai ordered an inquiry

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह (Dhanushyaban Symbol) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) गोठवले आहे. शिवसेनेच्या इतिहासामधील ही आजवरची सर्वात मोठी घडमोड असून यामुळे शिवसेनेवर मोठं संकट आलं आहे. या संकटात भाजपसह (BJP) इतर विरोधी पक्ष शिवसेना (Shivsena) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. राणा दाम्पत्याने (Rana Couple) मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा हट्ट केला होता. त्यावेळी त्यांना अटक झाली. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

 

राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र राणा दाम्पत्यांना 14 दिवस उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या (Mumbai Police) माध्यमातून तुरुंगात टाकलं, राजद्रोहाचा गुन्हा (Crime of Treason) दाखल केला. आणि त्यांनी हनुमान चालीसेचा विरोध केला. त्यामुळे प्रभू श्रीराम (Lord Shri Ram) यांनी उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण हिसकावून घेतला असल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. हनुमानाने उद्धव ठाकरेंना हा श्राप दिलाय, म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेला विरोध केला, त्याचीच ही सजा मिळाली आहे, असा टोला राणा यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिवसेनेतील वादावर भाष्य केले. ते म्हणाले, पक्षप्रमुख म्हणून चुका होत राहतात काही चुका या उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाल्या असतील. मात्र एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्ष संपवून टाकावा, आता तेही संपले आणि तुम्ही संपले. अशी स्थिती निर्माण होता कामा नये. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे आपण सर्वजण आशेने पाहतो आहे. मात्र न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल असे वाटत नाही असेही मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

 

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोठ्या मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली,
त्यांच्याच मेहनतीमुळे धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठाही संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली.
आणि वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे यांची जी पुण्याई होती त्या शिवसेनेचे दोघांच्या भांडणामुळे
दोन तुकडे झाले असून शिवसेना ही दुभंगली गेली आहे.
हे राज्याच्या दृष्टीने ही योग्य नाही व शिवसेनेच्या दृष्टीने ही योग्य नाही.
मात्र दुसरीकडे यामुळे भाजपला  मजबूत होण्याची संधी आहे. असेही मत एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Web Title :- Shivsena | Opposition to Hanuman Chalisa led Lord Rama to grab Thackeray’s bow and arrow, criticizes MLA Ravi Rana

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | पक्षप्रमुख म्हणून चुका होतात, पण चूक एवढी मोठी नसावी ज्यामुळे पक्षच संपावा, एकनाथ खडसेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandni Chowk | चांदणी चौकातील वाहतूक रात्री अर्ध्या तासासाठी बंद राहणार

Ambadas Danve | दिल्लीच्या समोर पाय चाटायला शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवले नाही, अंबादास दानवेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

Pune Crime | बहिणीला भेटायला आल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण

 

Related Posts