IMPIMP

Sanjay Raut | ‘मंत्री महोदय, ही धमकी समजायची का?’ – संजय राऊत

by nagesh
Shambhuraj Desai | first reaction of shinde faction on sanjay raut claim about cm eknath shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापला आहे. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. राज्य सरकार डरपोक आहे, पळकुटे आहे, असे राऊत म्हणाले होते. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना षंड म्हटले होते. त्यावरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना इशारा दिला होता. संजय राऊतांनी तोंड आवरावे, संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा काहीएक अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असे देसाई म्हणाले. त्यावर संजय राऊतांनी ही धमकी समजायची का? असा प्रश्न देसाईंना केला आहे. (Sanjay Raut)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंत्री महोदय, ही धमकी समजायची का? महाराष्ट्राच्या बाजूने लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर शांत आहे म्हणून जनता शांत बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील. हाच याचा अर्थ, असे संजय राऊत म्हणाले आहेत. (Sanjay Raut)

 

 

संजय राऊतांवर टीका करताना देसाई म्हणाले, आताच तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करून तुरुंगाबाहेर आला आहात. तुरुंगाबाहेरील वातावरण तुम्हाला मानवत नाही असे दिसत आहे. म्हणूनच तुम्ही अशी वक्तव्ये करत आहात. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्ये करणे टाळा. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी एकप्रकारे संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात पाठवू, असा धमकीवजा इशाराचा दिला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढत आहोत. पण उगाच या वादाचा राजकीय फायदा घेतला जात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत षंड म्हणाले आहेत. त्यांचा मी धिक्कार करतो. समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. असे असताना राऊतांनी षंड शब्द वापरला. संजय राऊत यांनी स्वतः लढ्यात उतरावे आणि मग मुख्यमंत्र्यांना बोलावे, असे देसाई म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut is this a direct threat rautas question to shambhu raj desai

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”

Maharashtra Karnataka Border Issue | कोल्हापूर कर्नाटक धावणाऱ्या एसटीच्या 660 फेऱ्या रद्द

Supreme Court Mobile App 2.0 | खटल्यांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे अ‍ॅप

 

Related Posts