IMPIMP

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | shivsena sanjay raut slam mp hemant godse nashik press conference

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेतून आणखी एक खासदार बाहेर पडला आहे. हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे
शिवसेनेला आणखी एक धक्का मिळाला आहे. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे
यांची कारकीर्द संपली. त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली आहे. त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. त्यांनी गोडसेंना आव्हान दिले आहे.

तुरुंगातून सुटका झाल्यावर राऊत (Sanjay Raut) यांनी पहिल्यांदाच नाशिक दौरा केला. यावेळी राऊत म्हणाले, शिवसेनेचे 40 आमदार गेले, 13
खासदार गेले; पण शिवसेना आहे तशीच आहे. शिवसेनेविषयी लोकांच्या मनात आदराची भावना आहे. नाशिकमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी भेटत आहेत.
सामान्य जनता भेटते आहे. थोडासा पालापाचोळा उडाला आहे. तोही शांत होईल. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा लोकसभेला निवडून
येऊन दाखवावे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गोडसे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागी शिवसेनेचा चेहरा कोण असेल? या प्रश्नावर राऊतांच्या उत्तराने पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला. ‘हेमंत गोडसे हे काय चेहरा आहेत का’?, असे राऊत म्हणताच पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला. शिवसेनेत चेहरा वगैरे काही नाही. शिवसेना हाच एक चेहरा आहे. शिवसैनिक हीच आमची ताकद आहे. शिवसैनिकच आमदार, खासदार निवडून देतात. शिवसैनिक आमच्यासोबत आहेत, तोपर्यंत आम्हाला कशाची चिंता नाही. थोडासा पालापाचोळा उडला आहे. आज या गटात, उद्या त्या गटात, असे चालूच राहते. त्यामुळे कोणाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असे राऊत यांनी नमूद केले.

Web Title :- Sanjay Raut | shivsena sanjay raut slam mp hemant godse nashik press conference

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीला दिली जिवे मारण्याची धमकी; होणाऱ्या नवऱ्याला दाखविणार होता ‘ते’ फोटो

Pune Crime | पुण्याच्या विश्रांतवाडीतील सराईत गुन्हेगार राज भवार व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 111 वी कारवाई

Pune Pimpri Crime | कामाचे पैसे मागितल्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण; दोन भावांवर FIR

CM Eknath Shinde | कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद ! अखेर जत तालुक्याला मिळणार न्याय, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ माेठी घोषणा

Related Posts