IMPIMP

SEBI | अब्जाधीश वाडिया कुटुंबावर सेबीची कारवाई, 2 वर्ष बंदी आणि 16 कोटींचा दंड; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
SEBI | sebi bars bombay dyeing ness wadia others from securities market for up to 2 yrs imposes rs 15-75 cr fines

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (Bombay Dyeing & Manufacturing Company Limited) या कंपनीचे प्रवर्तक आणि अब्जाधीश वाडिया कुटुंबावर शेअर बाजाराचे नियमन करणार्‍या सेबीने (SEBI) दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. स्टॉक मार्केटमधून (Stock Market) बंदी घालण्यात आलेल्या प्रवर्तकांमध्ये नुस्ली एन वाडिया (Nusli N Wadia), नेस वाडिया (Ness Wadia) आणि जहांगीर वाडिया (Jehangir Wadia) यांचा समावेश आहे. तसेच सेबीने (SEBI) त्यांना 15.75 कोटी रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वाडिया कुटुंबियांना सेबीने (SEBI) 45 दिवसांच्या आत दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीने बॉम्बे डाईंगवर 2.25 कोटी रुपये, नुस्ली वाडियावर 4 कोटी रुपये, जहांगीर वाडियावर 5 कोटी रुपये, नेस वाडियावर 2 कोटी रुपये, मेहतावर 50 लाख रुपये, स्केलवर रु. 1 कोटी आणि स्केलच्या तत्कालीन संचालकांना प्रत्येकी रु. 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

वाडिया समूहाची (Wadia Group) कंपनी स्केल सर्व्हिसेस लिमिटेडवर (Scale Services Limited) सुद्धा बंदी घातली आहे. त्याचबरोबर माजी संचालक डी. एस. गागरट (Former Director D. S. Gagarat), एन.एच. दातनवाला (N.H. Datanwala), शैलेश कर्णिक (Shailesh Karnik), आर. चंद्रशेखरन (R. Chandrasekaran) आणि दुर्गेश मेहता (Durgesh Mehta) यांच्या विरोधातही कारवाई केली आहे. यापुढे सेबीने वाडिया कुटुंब आणि मेहता यांना एका वर्षाच्या कालावधीसाठी, एका सूचीबद्ध कंपनीमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून सिक्युरिटीज मार्केटशी संबंधित होण्यावर निर्बंध घातले आहेत.

 

सेबीच्या माहितीनुसार, बॉम्बे डाईंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचे चुकीचे आर्थिक तपशील सादर करण्यात
आले.  काही तक्रारींवर आधारित बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या प्रकरणांमध्ये आर्थिक वर्ष
2011-12 ते आर्थिक वर्ष 2018-19 या कालावधीसाठी तपशीलवार तपास करण्यात आला.

 

प्रतिबंधित प्रवर्तक आणि संस्थांनी 2,492.94 कोटी रुपयांच्या विक्रीतून 1,302.20 कोटी रुपयांच्या नफ्यात
फेरफार केला आणि त्यात वाढ केल्याने बीडीएमसीएलच्या (BDMCL) आर्थिक तपशीलावर परिणाम झाला असल्याचे
सेबीला त्यांच्या तपासात आढळून आले. बीडीएमसीएलचे आर्थिक तपशील जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने
मांडण्यासाठी कंपनीचे प्रवर्तक वाडिया कुटुंबाने ही योजना राबवण्यात सक्रिय भूमिका बजावली, असा आरोप आहे.
चुका करूनही ते जाणीवपूर्वक निष्क्रिय राहिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  SEBI | sebi bars bombay dyeing ness wadia others from securities market for up to 2 yrs imposes rs 15-75 cr fines

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | एकनाथ शिंदेंच्या खास आमदाराला शिवसेनेचा शह? कोकणातील माजी आमदाराच्या कन्येला देणार संधी

Gopichand Padalkar | लवकरच राष्ट्रवादीच्या मुंबई आणि बारामती कार्यालयावर भाजपचा झेंडा असेल, गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Eknath Khadse | खडसेंच्या पाठीमागे पुन्हा चौकशीचा फेरा? भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची पुन्हा होऊ शकते चौकशी

 

Related Posts