IMPIMP

Shambhuraj Desai | अजित पवारांच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले – ’70 हजार कोटी खर्च करुनही…’

by nagesh
Shambhuraj Desai | Maharashtra minister shambhuraj desai criticized ajit pawar over cm eknath shinde

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन  राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader
Ajit Pawar) यांनी केला होता. अजित पवारांच्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. घाई गडबडीत फाईल
क्लिअर केल्या की पृथ्वीराज (Prithviraj Chavan) बाबा म्हणाले तसं होतं. 70 हजार कोटी खर्च करुन 1 टक्काही काम होत नाही, असा टोला शंभूराज
देसाई (Shambhuraj Desai) यांनी अजित पवारांना लगावला. ते कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

70 हजार कोटी खर्च करुन एक टक्काही फायदा झाला नाही, असं काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. हा तोटा असतो
घाई गडबडीत फाईल क्लिअर करण्याचा, अशा शब्दात शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. सुट्टीवर
असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 65 फाईल क्लिअर केल्या होत्या. यावर अजित पवार यांनी टीका केली होती. त्याला
देसाई यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.

 

घाई गडबडीत फाईल क्लिअर केल्या की 70 हजार कोटी खर्च करुन 1 टक्काही काम होत नाही.
त्यामुळे आम्ही चार चार वेळा बघून फाईल क्लिअर करतो. पब्लिक इंटरेस्ट असेल तरच गडबड करतो.
आम्हाला लोकांचे हित महत्त्वाचे आहे. राज्याच्या तिजोरीतील पैसा योग्य प्रमाणात खर्च झाला पाहिजे याची
खबरदारी आम्ही घेतो, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

 

 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर

राज्यभर सुरु होणाऱ्या राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी योजनेचा शुभारंभ सातारा जिल्ह्यातील
पाटण मरळीमधून होणार आहे. शनिवारी (दि.13) मे ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या योजनेतून 25 हजार नागरिकांना
फायदा दिला जाणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Shambhuraj Desai | Maharashtra minister shambhuraj desai criticized ajit pawar over cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Pune Police API Transfer | पुणे पोलिस न्यूज : विशेष शाखेतील 11 सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह 12
अधिकार्‍यांच्या विविध पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त्या

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – 75 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील 7 जणांसह इचलकरंजीमधील एकाविरूध्द गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : 33 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

 

Related Posts