IMPIMP

Sharad Pawar And Eknath Shinde | शरद पवार यांच्या नंतरचे राज्यातील सर्वात मोठे बंड; पवार यशस्वी ठरले, एकनाथ शिंदे यशस्वी होतील का?

by nagesh
CM Eknath Shinde | eknath shinde showered praise on sharad pawar in pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar And Eknath Shinde | विधान परिषदेच्या निवडणुकीची (Maharashtra Legislative Council Election) मतमोजणी पूर्ण होण्याअगोदर शिवसेनेचे नेते, मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या गटातील आमदारांसह सुरत गाठले आणि ते महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे बंड ठरले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऐन अधिवेशनात वसंतदादा पाटील यांच्याविरुद्ध 40 आमदारांना घेऊन बंड केले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री होऊन पुलोद सरकारची स्थापना केली होती. एकनाथ शिंदे यांचे हे बंड यशस्वी होईल की नाही? हे काही दिवसात समजून येईल. पण, हे राज्यातील सर्वात मोठे बंड ठरले आहे हे नक्की. (Sharad Pawar And Eknath Shinde)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काँग्रेसच्या (Congress) राज्यात मुख्यमंत्री डोईजोड होऊ नये, यासाठी दिल्लीतील काँग्रेस हायकमांडच्या आर्शिवादाने अनेकदा मुख्यमंत्र्यांविरुद्ध बंड झाली आहेत. मात्र, त्यात मुख्यमंत्री बदलण्याची मागणी होत असे. आता मात्र, युती बदलण्यासाठी बंड झाले आहे. त्यात शरद पवार यांचे बंड सर्वाधिक गाजले. त्यातूनच “पाठीत खंजीर खुपसणे” ही राजकीय म्हण उदयाला आली आहे. आणीबाणी उठविल्यानंतर केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. त्यांनी काँग्रेसची राज्य सरकारे बरखास्त करुन निवडणुका घेतल्या. तोपर्यंत काँग्रेसमध्ये फुट पडली होती.

 

इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस अस्तित्वात आली होती. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्ष 99 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर रेड्डी काँग्रेस 69 , इंदिरा काँग्रेस 62, शेकाप 13, माकप 9,अपक्ष 36 निवडून आले होते. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने तेव्हा रेड्डी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांनी मिळून सरकार स्थापन केले. वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे (Nashikrao Tirpude) उपमुख्यमंत्री झाले. शरद पवारही या मंत्रीमंडळात मंत्री होते. मात्र, काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना इंदिरा काँग्रेसची विशेषत: नाशिकराव तिरपुडे यांची दादागिरी सुरु होती. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांमध्ये खदखद होती. (Sharad Pawar And Eknath Shinde)

 

अधिवेशन सुरु असताना ही खदखद बाहेर येऊ लागली होती. तेव्हा शरद पवार यांनी वंसतदादा पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगून सर्वांना गाफिल ठेवले आणि दुसर्‍या दिवशी 40 आमदारांसह स्वत:चा वेगळा गट स्थापन केला. त्याला जनता पक्षाने तातडीने पाठिंबा दिला. अल्पमतात आलेल्या वसंतदादा पाटील यांनी 17 जुलै 1978 रोजी राजीनामा दिला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 18 जुलै 1978 रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी राजीनामा देताना वसंतदादा पाटील यांनी आपल्या पाठीत ‘खंजीर’ खुपसल्याची भावना व्यक्त केली होती. ही प्रतिक्रिया आजही शरद पवार यांची पाठ सोडत नाही. कोणीही बंड केले तर आवर्जुन ‘पाठीत खंजीर खुपसला’ असे म्हटले जाते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत खूपच साम्य आहे. तेव्हाही जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता. तरी त्याला विरोधी पक्षात बसावे लागले होते. त्यानंतरच्या दोन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले होते. आजही सर्वात मोठा पक्ष असताना भाजपला (BJP) विरोधी पक्षात बसावे लागले आहे. त्यानंतरच्या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन केले आहे. आता शरद पवार यांचे बंड यशस्वी झाले. एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होईल का? ते पुढील 2 ते 3 दिवसात समजून येईल.

 

शरद पवार हे मुख्यमंत्री असताना हायकमांडच्या इशार्‍यावरुन त्यांच्याच मंत्रीमंडळातील
मंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी बंड केले होते.
राजीव गांधी यांना शरद पवार हे डोईजोड होऊ लागले असल्याचे वाटू लागले होते.
म्हणून त्यांना लगाम घालण्यासाठी हे बंड घडवून आणले होते. काही दिवसात हे बंड शमले होते.

 

Web Title :- Sharad Pawar And Eknath Shinde | The biggest uprising in the state after Sharad Pawar; Pawar succeeds, will Eknath Shinde succeed?

 

हे देखील वाचा :

Aaditya Thackeray Twitter Bio | राजकीय भूकंप होणार ? आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला; राजकीय चर्चांना उधाण

MLA Devendra Bhuyar | ‘माझ्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे सक्षम आहेत पण…’ – आमदार देवेंद्र भुयार

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल…’ – संजय राऊत

 

Related Posts