IMPIMP

Sharad Pawar | भाजपने निवडलेल्या कुस्तीगीर परिषदेला मोठा झटका; शरद पवारांची परिषद भरवणार महाराष्ट्र केसरी आखाडा

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar comment on himachal pradesh and gujarat assembly election 2022 result

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखालील कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यानंतर भाजप खासदार रामदास तडस (BJP Leader Ramdas Tadas) यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र केसरीचा आखाडा (Maharashtra Kesari Akhada) भरवणार होती. पण, त्यांच्या या प्रयत्नावर मुंबई हायकोर्टाने (Mumbai HIgh Court) पाणी फेरले आहे. भारतीय कुस्ती महासंघाने (Indian Wrestling Association) घेतलेली निवडणूक आणि निवडलेली समिती ही चुकीची असल्याने निवडणूक रद्द ठरवण्यात आली आहे. यामुळे शरद पवारांच्या (Sharad Pawar) अध्यक्षते खालील कुस्तीगीर परिषदेचा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेनं महाराष्ट्र कुस्ती परिषदेची कार्यकारणी बरखास्त केली होती. मात्र, आता शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्ष राहिलेल्या बरखास्त महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून रामदास तडस गटाला मोठा दणका मिळाला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landage) यांनाच सरचिटणीस म्हणून पूर्ण अधिकार असतील. रामदास तडस गटाला कोणतेही अधिकार नसतील, असे कोर्टाने सांगितलं आहे.

भाजप नेते रामदास तडस हे पुण्यात महाराष्ट्र केसरी आखाडा भरवण्याच्या प्रयत्नात होते.
पण महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचा निर्णय आज मुंबई हायकोर्टाने दिले.

 

 

Web Title :-  Sharad Pawar | big decision of bombay high court about maharashtra kesari wrestling competition

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | आदित्य ठाकरे भारत जोडोत जाणार म्हणजे बुडत्याला गांधींचा आधार – भाजप

Kirit Somaiya | अनिल परबांना न्यायालयात हजर राहून हिशोब द्यावा लागणार – किरीट सोमय्या

Sanjay Raut | संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

Shambhuraj Desai | ‘धोतऱ्याच्या कडू बिया’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना शंभूराज देसाई यांचा टोला, म्हणाले-‘102 दिवस कारागृहात असल्यामुळे त्यांना…’

 

Related Posts