IMPIMP

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

by sachinsitapure
Maharashtra Political News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Sharad Pawar On Praful Patel | भाजप (BJP) आणि शिवसेनेबरोबर (Shivsena) २००४ मध्येच शरद पवार युती करणार होते. माझ्या घरीच यासाठी बैठकी झाली होती, असे म्हणत अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या कर्जत येथील शिबिरात शरद पवार यांच्यावर आरोप केला होता. तसेच माझ्याकडे इतके मटेरियल आहे की, भविष्यात एक पुस्तक लिहिले जाईल, असेही त्यांनी म्हटले होते. यावर आता शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेलांचा बुरखाच फाडला आहे. ईडीला घाबरून पटेल भाजपासोबत सत्तेत गेल्याचे पवारांनी (Sharad Pawar On Praful Patel) म्हटले आहे.

आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल, अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनिल तटकरे यांनी कर्जतच्या शिबिरात केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

शरद पवार म्हणाले, चांगली गोष्ट आहे. प्रफुल पटेल यांचे पुस्तक कधी येत आहे याची मी वाट पाहत आहे.
त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी त्यावर पुस्तक लिहावे. त्यात त्यांनी एक प्रकरण अलिकडे लोक पक्ष सोडून
का जातात यावर लिहावे. त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असे ऐकले आहे.
त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावे. (Sharad Pawar On Praful Patel)

शरद पवार म्हणाले, मुंबईत प्रफुल पटेल यांचे घर आहे. त्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले आणि का ताब्यात
घेतले यावरही एक प्रकरण पुस्तकात यावे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या ज्ञानात भर पडेल.

Related Posts